Homeबातम्याबालकांसाठी बदलापुरात शिबीर सुरू

बालकांसाठी बदलापुरात शिबीर सुरू

चालुक्य बालभवन बदलापूर आयोजित उन्हाळी संस्कार आनंद शिबिर चा पहिला दिवस नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला.

प्रथम संस्थापक अनिल शेवंती कृष्णा चाळके (चालुक्य) यांनी चालुक्य पॅलेसच्या प्रवेशद्वारावर शिबिरार्थी मुलांमुलींबरोबर पालक आणि शिक्षकांवर फुलांच्या पाकळ्यांची उधळत स्वागत केले. नंतर सर्वांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. वरीष्ठ शिक्षिका मयुरा सैदम यांनी संस्थेची ओळख करून दिली. नंतर “इतनी शक्ती हमे देना दाता” हे इशस्तवन होवून “आमच्यासाठी बालभवन” हे गीत घेण्यात आले.

पहिल्या दिवशी मयुरा सैदम यांनी उत्कृष्टरित्या हस्तकला शिकवली. सर्व बालगोपाळ अगदी रंगून गेले होते.

मध्यंतराला वदनी कवळ घेता म्हणत घरातून आणलेल्या पदार्थावर ताव मारला. शिबिरार्थी दुर्वा उतेकर आणि इरा मोरे या दोन मुलींनी लाठीकाठी चे प्रात्यक्षिक फार सुंदर रित्या सादर केले.

सर्वात शेवटी “शुभं करोती कल्याणं” हि प्रार्थना घेण्यात आली.

पालक निशिगंधा मोरे यांनी सहाय्यकची तर पालक दिनेश मोरे (आजोबा) यांनी छायाचित्रकाराची भुमिका उत्कृष्टरित्या बजावली. पालक राकेशमामा चव्हाण आणि पालक प्रवीण उतेकर कार्यकर्ते म्हणून उपस्थित होते. दहा दिवस चालणार्‍या शिबिराचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात पार पडला.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments