Homeबातम्या"न्यूज 18"चा स्तुत्य उपक्रम

“न्यूज 18″चा स्तुत्य उपक्रम

न्यूज 18 या वृत्त वाहिनीच्या वतीने नवी मुंबईतील ताज विवांता या हॉटेलमध्ये “स्टार्टअप महाराष्ट्र” हा महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायाला चालना देणारा प्रेरणादायी कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस या वाहिनीचे संपादक श्री मंदार फणसे यांनी उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांची अत्यंत अभ्यासपूर्ण मुलाखत घेतली. श्री उदय सामंत यांनीही अतिशय मनमोकळेपणाने, उत्तमरीत्या उत्तरे दिली.

या मुलाखतीनंतर महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी विविध प्रकारचे, वैशिष्टय़पूर्ण उद्योग, व्यवसाय करीत असलेल्या स्त्री आणि पुरुष उद्योजकांचा उद्योग मंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सर्व सत्कार मूर्तीनी नेमक्या शब्दात आपापली मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन फराह खान हिने अतिशय उत्कृष्ठपणे केले.

उद्योग मंत्र्यांना पुस्तक भेट : या कार्यक्रमानंतर उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांना न्यूज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेले “करिअरच्या नव्या दिशा” हे पुस्तक भेट देऊन, पुस्तकाच्या वैशिष्ट्यांविषयी सांगितले. विशेष म्हणजे, त्यांनी ते सर्व मन लावून ऐकले.

या कार्यक्रमास उद्योग, व्यापार आणि इतरही क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ + 91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments