अक्ष…

नमस्कार मंडळी,
आज नेत्र दिवस आहे. त्या निमित्त ही विशेष कविता.

मी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे नुसता निर्णयच नाही, तर आवश्यक ते संमतीपत्र खुद्द नेत्र विशारद पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्याकडे भरून दिले आहे. बघा, आपल्यालाही असा निर्णय घेता येतो का ?
— संपादक

धन्यवाद विध्यात्या
दिलेस आम्हां अक्ष
पाहू शके तव सृष्टि
दृष्टि जाहलीगवाक्ष

चिदानंदानुभव घेई
जादुगिरी ती समक्ष
मुर्तीरुपा गुरु रुपात
दर्शन मिळतेप्रत्यक्ष

वाचू शके ग्रंथालया
दयाळा भरला कक्ष
चिंबलो ज्ञान सरिते
दृष्टि हा अजानवृक्ष

चे वाच्छिल ते लाभे
प्राप्तजणूं कल्पवृक्ष
लढायला संकटाशी
होऊ भला चातुर्दक्ष

काहीजण अक्षहीन
का केलेस तू दुर्लक्ष
का वंचित ठेवे तया
तू असून ही निष्पक्ष

नेत्रदान पर्याय देशी
धन्यधन्य विरुपाक्ष
संधी मिळे कृतज्ञते
पुण्य मिळे लक्षलक्ष

नेत्र दान हे नंदनवन
फुलारे माळरानरुक्ष
शक्य सारे तुज मुळे
तुझ्या कृपेचाकटाक्ष

हेमंत मुसरीफ

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments