Homeसाहित्यराजर्षी महाराज ..

राजर्षी महाराज ..

मनोमन राजर्षी शाहू
सरले जरीही शतक
बहुभाषा त्याअवगत
ज्ञान सागरी स्नातक

असा राजा नसे दुजा
पुरोगामीत्वा ज्ञोतक
बंदिस्त हो अंधश्रद्धा
रुढीपरंपरांही घातक

नीतरमले जनहितार्थ
महाराज तरी सेवक
जातीभेद दिला छेद
आरक्षणाचे ते जनक

कलाकारां राजाश्रय
खरोखर रे गुणग्राहक
शिक्षणमुफ्त सक्त हो
निर्मीअसंख्य स्नातक

शिक्षण खुले सर्वांना
कैक भाषा अभ्यासक
आधी केले मग बोले
विरळा सार्थ प्रशासक

शत्रूसाठी कर्दनकाळ
अग्नी जणूं हे दाहक
बळीराजा सुखी केला
योजना ताटवे मोहक

दीन दलीत बहुजनांना
रे मंत्र लाभला तारक
गुन्हेगारांत माणूसजपे
सार्थ समाज सुधारक

कसा हवा राज्यकर्ता
आखून दिधले मानक
कायदे सक्षम बनवले
ऋण मुक्त केले ऋणक

हेमंत मुसरीफ

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

Previous article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments