Homeयशकथासंवादभूषण : 8

संवादभूषण : 8

“कांचन कंदले”

देवेंद्र भुजबळ लिखित, न्यूज स्टोरी टुडे प्रकाशित “संवादभूषण” हे प्रेरणादायी व्यक्तींच्या सत्य कथा असलेले पुस्तक नुकतेच वाचनात आले.

स्वानूभवातूनच स्वतःचे असे तत्त्वज्ञान जगलेले लेखक देवेंद्र भुजबळ यांच्या दृष्टीने “माणसाच्या परिस्थितीपेक्षा त्याची मनस्थिती महत्त्वाची असते” म्हणून जे लोक प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवनात यशस्वी झाले आहेत आणि इतरांनाही यशस्वी होण्यासाठी मदतीचा हात देतात अशा सत्तावीस पुरुष, सात महिला सह 34 जणांशी त्यांनी जात, धर्म, वर्ण, वर्ग, लिंग असा कोणताही भेद न बाळगता संवाद साधला आहे. या संवादातून निर्माण झालेले हे “संवादभूषण” पुस्तक त्यांनी वाचकांसमोर ठेवलेले आहे.

यापैकीच एक “संवादभूषण” सोलापूर येथील सौ कांचन कंदले या आहेत. त्यांच्या बाबतीत ते आपल्या लिखाणात म्हणतात, “कांचन कंदले या मुंबईतील एका सधन व सुशिक्षित अशा स्वातंत्र्यसैनिकाच्या घरी जन्मल्या. आपल्या बालपणी स्वातंत्र्याचा पूर्णपणे आनंद घेत त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. मुलगी असतानाही मुलांमध्ये खेळण्याची त्यांची आवड पाहून घरातील मंडळी “बाळ्या’ या मुलाच्या नावाने तिला संबोधित करीत असे. कांचन शालेय शिक्षण घेताना मैदानी खेळ, वक्तृत्व, गायन, नृत्य, नाटक अशा सर्व क्षेत्रात अगदी मनापासून सहभाग घेत होत्या असेही दिसते. यातून त्यांनी आपल्या आईच्या कलेचा वारसा जपला. तर समाजसेवेचा वडिलांचा वारसाही त्या पुढे चालविताना दिसतात.

मुंबईसारख्या मोठ्या शहरात आपले बालपण घालवणारी ही कांचन कदाचित खेळकर आणि खोडकर ही असेल पण रितीरिवाजानुसार त्यांनी सोलापूरच्या, श्री.देशभूषण विठ्ठलराव कंदले यांच्याशी लग्न केले. मुंबई सारख्या मोठ्या शहरात राहण्याची सवय असतानाही मुंबईच्या मानाने छोटे असणाऱ्या सोलापूरसारख्या गावी येऊन त्या आपला संसार आनंदाने
करू लागल्या. लग्नानंतरही केवळ घरात अडकून पडण्यापेक्षा त्यांच्या धडपडी मनाने इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला. आपली मुले, संसार सांभाळीत त्यांनी हा व्यवसाय नाव रूपाला आणला. त्याकाळी भारतीय समाजात एखाद्या महिलेने अर्थाजन करणे हे मोठे कठीण काम होते. पण आजतागायत त्या हे काम यशस्वीपणे करीत आहेत. त्यासोबतच कांचन ताई या अर्थाजन करता करता अर्थाजनाच्याही पलीकडे जाण्यासाठी, जीवन जगण्यासाठी त्यां एककल्ली निर्णय घेण्यापेक्षा साधकबाधक विचार करून घरच्यांच्या संमतीने म्हणजेच अगदी पोक्त विचारानुसार आपल्या कलेला वेळ देण्याचा प्रयत्न करतात. यातून त्यांनी कलेचा स्वतःही घेतला आणि इतरांनाही दिला, हे दिसते.

जीवनात आनंद घेत असतानाच आपण समाजाचेही काही देणे लागतो या भावनेतून त्यांनी अखिल भारतीय सो.क्ष. कासार समाज पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा प्रमुख पदाची आलेली जबाबदारी मोठ्या आनंदाने स्विकारली आणि ती समर्थपणे पार पाडत आहेत. कोरोना काळातही जे शक्य आहे ते काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला ही बाब मोठी कौतुकाची आहे. समाजातील सर्वसामान्य महिला या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अशा या महिलांनी स्वतः उद्योगधंद्याकडे वळावे यासाठी त्या प्रामाणिक धडपड करीत असतात. आपले उद्योगधंद्याचे काम करताना आपल्या भारतीय समाजात एखाद्या महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात घेऊन महिलांसाठी त्या एक मोलाचा सल्ला देतात. त्या म्हणतात, “प्रथम आपण दादा, भाऊ म्हणत पुढे चलावे पण एखाद्या वेळी वाईट प्रसंग आलाच, तर दोन हात करायलाही मागे पुढे पाहू नये !” असा हा मौल्यवान धडा स्वतःच्या पायावर उभे राहून इच्छिणाऱ्या महिलांना देताना दिसतात.

कांचन कंदले यांच्या एकूण जगण्यातूनच सर्वसामान्य महिलांना संसार करता करता अर्थाजन व समाजसेवाही करता येते याचा आदर्श त्यांनी महिलांपुढे ठेवला आहे. अशा या संवाद भूषण कांचन कंदले सर्व महिला आणि मुलींसाठी निश्चितच एक आदर्श आहे.

अशोक डोळ

— लेखन : अशोक डोळे. सोलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments