Homeसाहित्य'उंच उंच नेत गुढी'

‘उंच उंच नेत गुढी’

नमस्कार मंडळी.
आपल्या पोर्टल वर “नाती” म्हणुन एक सदर आहे. आज मात्र, आपल्या पोर्टलचे नियमित लेखक प्राचार्य सूर्यकांत वैद्य सरांनी त्यांच्या पत्नीच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 1966 साली लिहिलेली कविता सादर केली आहे. वैद्य मॅडमना न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

कु, भारती पंडित हिने 11 मे 1965 रोजी माझ्या जीवनात प्रवेश केला आणि ती सौ. भारती वैद्य झाली. गेली 61 वर्षे माझ्या संसाराची शिवशक्ती बनून तिने मला व माझ्या परिवाराला आत्मीयतेने सांभाळले. “माझ्या जगा” चे – लेखनाचे ती प्रेरणास्थान. तिनेच अबोल राहून माझ्या कवितेची गुढी उंच उंच नेली.

राहु देत गे अबोल
आकळते प्रीत तुझी
ओझरत्या स्पर्शातुन
पालवते नकळत ती

मनकोशी पाकळ्यात
खळखळती जे पराग
गायिले न आजवरी
आळविती गीत – राग

तरतरते गंधभाव
झाझरती रंध्रांतुन
नादताल झंकारत
जागविती देह, प्राण

किरणांच्या काळजात
सळसळते जे स्पंदन
ते निचेष्ट अंधारा
दे सचेत संवेदन

जे सखोल ते अबोल
जागरते शब्दाविन
अंतर्मन समजुन ये
कृतिगतिच्या रंगांतुन

उंच उंच नेत गुढी
तूच मला उभवियले
मातीच्या पुतळ्याला
तूच सखी प्राणियले

सूर्यकान्त द. वैद्य.

— रचना : सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vedvati Kulkarni on खरा डॉक्टर
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on प्राणांचे झुंबर…
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on आम्ही सिद्ध लेखिका : ठाणे, पुणे वृत्तांत
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on सुभाषित विवेचन : 2
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on शिक्षण : भारतीय मानसिकतेचा शोध