Homeलेख"गणेशभक्त नाना"

“गणेशभक्त नाना”

थोर कलाकर, एक मनस्वी व्यक्तिमत्व लाभलेले नाना पाटेकर यांचे प्रत्यक्षातील जीवन जसे नेहमीच धक्कादायक राहिले तशीच त्यांची कालची एक्झिट देखील खूपच धक्कादायक ठरली. त्यांच्या पार्थिवावर झालेले अंत्यसंस्कार दूरचित्रवाणीवर पाहून देखील अजून ते गेले, हे मानायला मन तयार नाहिये.

नाना गेल्याचे वृत्त समजल्यापासून त्यांच्याबद्दल जे जे लिहून येत आहे, ते ते मी वाचत आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर आणि समाज माध्यमांवर जे जे दाखविण्यात येत आहे, ते ही मी पहात आहे. पण नानाच्या एका मुद्द्याचा कुठेच उल्लेख झाल्याचे दिसून आले नाही, म्हणुन माझा हा लेखन प्रपंच आहे.

मी मुंबई दूरदर्शन केंद्रात मी 1986 ते 1991 अशी पावणे सहा वर्षे कार्यक्रम निर्मिती विभागात सेवा केली. या दरम्यान तीनचार वर्षे मी मुंबईतील गणेशोत्सवावर आधारित दूरदर्शन वृत्तांताच्या निर्मितीत सहभागी असायचो. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही चित्रीकरण सुरू करीत असू. विशेष म्हणजे एखादा परिपाठ असल्याप्रमाणे हे चित्रीकरण आम्ही नाना तेव्हा रहात असे, त्या त्याच्या माहीम (पश्चिम) बाजूला, एकदम रस्त्याला लागून असलेल्या नव सहयोग सोसायटीच्या तळ मजल्यावर असलेल्या घरापासून सुरू करायचो.

नानाचे माहीम येथील घर

नाना स्वतः कलाकर असल्याने, त्यात तो मूळचा रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील असल्याने आणि बहुतेक कोकणी लोक जसे पराकोटीचे गणेश भक्त असतात, त्या प्रमाणे नानाही असल्याने घरच्या गणपतीची आरास आणि मुख्य म्हणजे फुलांची सुंदर सजावट स्वतःच्या हाताने, अतिशय मन लावून करायचा. काही वेळा आम्ही पोहोचलेलो असलो तरी, त्याची सजावट करणे सुरूच असायचे. त्यामुळे आम्हाला आपसूकच लाईव्ह शॉट्स मिळायचे. नंतर आरती करून, नाश्तापाणी घेऊन आम्ही पुढील इतर मोठमोठ्या गणेश मंडळांच्या गणपतीचे, तेथील सजावटीचे, ऊत्सवाचे चित्रिकरण करून रात्री बारा एकच्या सुमारास दूरदर्शन केंद्रात परत येत असू. अर्थात ज्यांना शक्य असे ते दादर स्टेशनलाच उतरत असत. त्यावेळी दूरदर्शन ही एकमेव दूरचित्रवाणी वाहिनी असल्याने प्रत्येक ठिकाणी आमचे आगतस्वागत जोरदार होत असे. असो.

पुढे मी दूरदर्शन सोडून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनायात रुजू झालो. त्यामुळे नानाच्या घरी जाण्याचा किंवा इतर काही कारणाने समक्ष भेटण्याचा योग आला नाही.

गणेशभक्त नानाला विनम्र अभिवादन.

देवेंद्र भुजबळ

— छायाचित्र सौजन्य : फ्री प्रेस जर्नल
— लेखन : देवेंद्र भुजबळ. मुंबई.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments