नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घोषवाक्य स्पर्धेत, सौ. सुचित्रा कुंचमवार यांचे…
स्वच्छता असल्यास आसपास
निरोगी राहील आपले जीवन
परिसर गाव राज्य देश बनेल
सृष्टीवरचे सुजलाम नंदनवन..
हे घोषवाक्य सर्वोत्कृष्ट ठरल्याबद्दल त्यांना नुकताच विष्णुदास भावे नाट्यगृहात वनमंत्री गणेश नाईक, महापौर सुजाता पाटील, आमदार मंदा म्हात्रे तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

साहित्याच्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या कुंचमवार यांनी या यशातून स्वच्छतेच्या संदेशाला व्यापक व्यासपीठ मिळवून दिले आहे. स्वच्छता ही केवळ वैयक्तिक सवय नसून ती सामाजिक जबाबदारी आहे, हा विचार प्रभावीपणे जनमानसापर्यंत पोहोचविणाऱ्या त्यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
“अल्प परिचय”
सुचित्रा कुंचमवार या 10 वर्षांपासून विविध साहित्य प्रकारचे लेखन करत आहे. त्यांनी 550 शिव अभंगाचे लेखन केले आहे. त्यांचा अभंग आणि अष्टाक्षरी लिहिण्यात हातखंडा आहे. रोज एक अष्टाक्षरी असे विविध विषयांवर सलग 365 दिवस अष्टाक्षरी काव्यलेखन, एकाच विषयावर 511 चारोळी लेखन, रोज रांगोळी काढून त्यावर त्या चारोळी लेखन करीत असतात. या प्रकरणी प्रमाणे त्यांच्या 700 चारोळ्या लिहून व रांगोळ्या काढून झाल्या आहेत. त्याबरोबरच त्यांना वाचनाची देखील आवड आहे. त्यांचा अनेक काव्यसंमेलनात सहभाग असतो. त्या अनेक चॅनेलवर सुगरण म्हणून सहभागी झाल्या आहेत. अनेक वृत्तपत्र, मासिके, दिवाळी अंकात त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. याशिवाय त्या युट्यूब चॅनेलवर बातम्यांना आवाज देत असतात.
आता पर्यंत त्यांना…
द्रोणागिरी भूषण पुरस्कार ;
आर्य वैश्य युथ पुणे, वासवी रत्न पुरस्कार ;
नवी मुंबई गुणसम्राज्ञी, सक्षम महिला, आर्य वैश्य मुंबई समाजसन्मान पुरस्कार ;
मराठवाडा हिरकणी पुरस्कार
तसेच यासारख्या अनेक नामांकित संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अनेक काव्यसंमेलनात सक्रिय सहभाग असतो. टीव्हीवर अनेक चॅनेलवर सुगरण म्हणून सहभागी. अनेक वृत्तपत्र, मासिके, दिवाळी अंक यामध्ये लेखन प्रकाशित. अनेक यु ट्यूब चॅनेल वाहिनीवर बातम्यांना व्हॉइस देत आहे.

याशिवाय त्या शिक्षिका, समुपदेशिका, समाजसेविका, ग्रंथपाल, पोलीस मित्र नेरुळ, नवी मुंबई शहर अध्यक्षा, महिला दक्षता समिती सदस्या, नेरुळ पोलीस स्टेशन इत्यादी कार्यात सक्रिय आहेत.
न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे सुचित्रा कुंचमवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800*
