नको चांद आता
नको ह्या चांदण्या
नको गंध आता
नको त्या वेदना.
नव्या नक्षत्राचे
नवीन बहाणे
मला प्रियआता
माझेच ते गाणे.
असा ठेव आता.
सवे चंद्र कोरा
सखे मांडीला मी
वेदनेचा पसारा
जरा वेदनेचा
तसा रंग ओला
तुझ्या नजरेत
मुग्ध हा अबोला
मनाच्या तळाला
विझला निखारा
तुझ्या पैंजणाचा
अबोल साहारा

— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
