जीवनातल्या मुग्ध आठवणी
तरंगत होत्या ज्या क्षणी
‘मेंदूचा झटका’ आला
कोलमडून पडलो तत्क्षणी
भावगीतातून आयुष्य घडले
उतारवयात झाले विपरित
स्मृतींचे संचित का ?
ख्याल विलंब दृतगतीत
उपचारांचे सोपस्कार सारे
झाला पै पै चा चुराडा
मनांत नादावतो आता
करुणरसाचा पोवाडा
लावणीचे दिन ते सरले
आता उपदेशांची गाणी
अल्लड मैफिल आयुष्याची
भासते मज कंटाळवाणी
माळ आयुष्याची गुंफली
गात गात शिवरंजनी
ऑषधाची गोळी आता
भारुडातली आणीबाणी

— रचना : सुनील चिटणीस
— संपादन: देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
