Tuesday, February 10, 2026
Homeसाहित्यअरे, बजेट बजेट

अरे, बजेट बजेट

श्री चंद्रकांत बर्वे यांचा बजेट बद्दलचा हलका फुलका लेख आणि श्री मुरारी देशपांडे यांची ही हलकी फुलकी कविता आपण काल वाचली. आज स्वाती वर्तक यांची विडंबन पर कविता वाचू या !
— संपादक

अरे, बजेट बजेट (थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्यांची क्षमा मागून)

अरे, बजेट बजेट
खोटं कधी म्हणू नये
अर्थमंत्र्यांच्या लेखाला
बोटं कधी दावू नये

अरे, बजेट बजेट
कधी कोणा ना कळले
प्रत्येक अर्थतज्ञ सांगे
त्याचे अर्थ वेगवेगळे

अरे, बजेट बजेट
एकाला अपेक्षा दिसतात
तरी दुजा फक्त सदा
आक्षेप करीत फिरतात

अरे, बजेट बजेट
महाग दारू सिगारेटी होतात
तरीही रसिक मंडळी सदा
तेच ओढत तर बसतात

अरे, बजेट बजेट
काय फरक मारा गप्पा
कोटी कोटी म्हणताना
अरबोंचा ओलांडे टप्पा

अरे, बजेट बजेट
कर भरतो तुम्ही आम्ही
कर बुडव्यांना काय
देश कसली देतो हमी ?

स्वाती वर्तक

— रचना : सौ.स्वाती वर्तक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments