इथे सुसंस्कृत समाज राहत होता
आता इथली माणसं कुठे गेली ? !! धृ !!
तलावात डोकावून बघणारे झाडांसह
इथे एक निळा तलाव नांदत होता.
आता तिथे विशाल संकुल सिमेंटचे आहे !! 1 !!
इथे होती गर्द वृक्षांची हिरवाई
फुले प्राणी आणि पक्षी वनराई
आता इथे फ्लायओवर आहे !! 2 !!
इथे होते उंच वृक्ष दाट सुरूचे बन
त्यात रमायचे मानवाचे मन
आता तिथे बहुमजली हॉटेल आहे !! 3 !!
इथे होती झाडांची घनदाट जाळी
हसत खेळत फिरायच्या पोरीवाळी
आता तिथे अनाकलनीय पूल आहे !! 4 !!
इथे होती एक जीवनधारा नदी
पाणी देत पावसाळ्यात वाहत होती
आता तिचे पात्रात झोपडपट्टी आहे !! 5 !!
इंच इंच जागेची लालसा वाढते आहे
अहंकार युद्धाचे सावट पडले आहे
आत बाहेर वाद तंटे लढाई चालू आहे !! 6 !!
इथे सजग समाज राहत होता
इथली “माणसं” कुठे गेली ?

— रचना : शुभांगी पासेबंद. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
