“संशोधन“
‘मुलांनो, मला असं वाटतं, यावेळी शेतकर्यांवर संशोधन प्रबंध हाती घ्यावा.’
‘फारच छान !’
‘मग सगळ्यात आधी नामवंत लेखकांकडून या विषयावरच्या कथा मागवून घ्याव्या.’
‘ठीक आहे सर, पण याबाबतीत एक गोष्ट मनात येतेय.’
‘अरे, नि:संकोचपणे सांग.’
‘सर, शेतकर्यांवर संशोधन प्रबंध हाती घेत आहोत, तर त्यावरील कथांची गरज आहे का ?’
‘म्हणजे काय ? संशोधनासाठी कथेत शेतकरी हे पात्र असायलाच हवं.’
‘मला म्हणायचय, प्रत्यक्षात शेतकरी काय करतोय, कसा जगतोय, याचं वर्णन यायला नको का ?’
‘अजबच आहे तुझं बोलणं ! वास्तवातल्या पात्रांवर कधी संशोधन झालय ?’
‘पण सर, संशोधनात नवीन गोष्टी यायला हव्यात नं ?’
‘ओ ! समजलं तुला काय म्हणायचय !’
‘मग काय त्याबद्दल माहिती गोळा करूयात ?’
अरे बाबा, आपल्याला, लेखकाच्या लेखणीच्या टोकाच्या परिघात असलेल्या कथांमधील शेतकरी पात्रांवर संशोधन करायचय. त्यांच्याबद्दल वाचल्यानंतर अश्रूंसह दयाभव जागृत व्हायला हवा. शेत सोडून रस्त्यावरून ट्रॅक्टर फिरवणार्यांवर आपल्याला संशोधन करायचं नाहीये.’
‘पण असं तर ते आंदोलन करण्यासाठीच करताहेत नं !’
‘हे बघ, ज्या शेतकर्यांबद्दल तू बोलतोयस, त्यातील एक तरी अर्धा उघडा, अस्थिपंजर शरीर असलेला आहे का ?’
‘पण सर, आता काळ बदललाय. प्रत्येक जण प्रगती करतोय.’
‘बाबा, एक गोष्ट लक्षात ठेव, संशोधनासाठी शोषित असलेलीच पात्र योग्य ठरतात. अशा पात्रांच्या कथाच काळावर विजय मिळवणार्या ठरतात.
— मूळ कथा : शोध
— मूळ लेखिका : अर्चना तिवारी
— अनुवाद : उज्ज्वला केळकर
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सत्य विदारक आहे!