Homeबातम्यादेवेंद्र भुजबळ आज दूरदर्शन वर

देवेंद्र भुजबळ आज दूरदर्शन वर

भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीवर “शब्दांच्या वाटेवर” या आजच्या कार्यक्रमात रात्री 8.30 वाजता आपल्या पोर्टलचे संपादक- लेखक श्री देवेंद्र भुजबळ यांची मुलाखत प्रसारीत होत आहे.

मुलाखतकार पूनम चांदोरकर यांनी चांगले प्रश्न काढले होते. श्री भुजबळ यांना वाचनाची आवड कशी लागली, शब्दांच्या वाटेवर ते कसे वळले, लिखाणामागची त्यांची प्रेरणा,

देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेली पुस्तके
देवेंद्र भुजबळ यांनी संपादित केलेली पुस्तके

www.newsstorytoday.com या पोर्टलची निर्मिती, पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या लेखमाला पुस्तक रुपात कशा प्रकाशित झाल्या, अन्य पुस्तकांचे संपादन, प्रकाशन अश्या विविध प्रश्नांनी खूप छान मुलाखत झाली आहे.

ही मुलाखत पाहून आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यास आनंद होईल.

केंद्र प्रमुख श्री राजेश दळवी, निर्माते श्री दीपक शर्मा, सहायक निर्माते श्री संजय झनके, अन्य तंत्रज्ञ, सहकारी आणि मुलाखतकार पूनम चांदोरकर या सर्वांचे मनापासून आभार.

— टीम एन एस टी. ☎️ + 91 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. खूप खूप अभिनंदन सर!! सह्याद्री शी तुमचे जवळचे नाते!! तुमच्या मुळे अनेकांना प्रेरणा मिळत असतेच.. ही मुलाखत ही आगळे वेगळं काहीतरी नक्कीच देऊन जाईल याची मला खात्री आहे!!

  2. अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा आदरणीय संपादक भुजबळ साहेब

  3. नमस्कार देवेंद्र. आधी माझ्याकडून तुमचे खुप खुप अभिनंदन. तुमच्यामुळेच मला काहीतरी नवीन लिहायला नेहमीच प्रेरणा मिळते. तुमची मुलाखत आज आमच्या UK च्या वेळेस नक्कीच पाहीन, ऐकीन. असेच भरघोस यश उत्तरोत्तर मिळेलच याची खात्री आहेच. त्यासाठी माझ्याकडून खुप खुप शुभ कामना. मेसेज बद्दल मनापासून धन्यवाद. 🙏🙏🙏🙏

  4. अभिनंदन सर, शब्दांच्या वाटेवर फुलरूपात लेखणीला वेचलेत आणि पुस्तकांना नव्या कोऱ्या कल्पनांचा सुगंध दिलात.
    आपल्या यशाला अशीच उतुंग उंची लाभत राहो.
    स्वतः सोबत इतरांना पुढे नेत जावे.
    ह्या तुमच्यातील विचाराला त्रिवार सलाम !🙋‍♀️

    सौ. वर्षा महेंद्र भाबल.
    जुईनगर, नवीमुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments