छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय योग संस्थानचा ५९ वा स्थापना दिवस नुकताच धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास १०० हून अधिक जण उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना करुन झाली. सौ.सुनिता डोमाळे यांनी सुत्र संचालन केले. यानंतर श्री मधुकर पवार सरांनी योगासने घेतली. जिल्हा प्रधान श्री वैजनाथ डोमाळे सरांनी प्रास्तविक सांगितले. योग साधिकांनी सरस्वती वंदना सादर केली.
श्रद्धेय प्रकाशलालजी यांनी दिल्ली येथे ५९ वर्षांपूर्वी योग वर्ग निशुल्क सुरू केला होता. उपप्रांत प्रधान, महाराष्ट्र. डॉ. उत्तम काळवणे सर यांचा वाढदिवस आणि महावीर जयंती असा दुग्धशर्करा योग या कार्यक्रमात जुळून आला.
देवी सरस्वती व श्रद्धेय प्रकाशलालजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, योग प्रशिक्षक श्री महेंद्र रंगारी, विभागीय मंत्री आनंद अग्रवाल, जिल्हा प्रधान वैजनाथ डोमाळे, विद्या ताकसांडे, राधा पारेख, जिल्हा मंत्री मीना पिसोळे, देवेंद्र नाथ, अधिकारी मधुकर पवार, अरुण थोरात सर्व अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री ललित कासार यांनी एक भक्तीगीत सादर केले.
श्री सुरेन्द्र कुलकर्णी त्यांच्या भाषणात म्हणाले की, आज प्रत्येक नागरिकाला योग, प्राणायाम याची आत्यंतिक गरज आहे. ती गरज भागविण्याचे काम भारतीय संस्थान निशुल्क करत आहे, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
योग प्रशिक्षक श्री महेन्द्र रंगारी यांनी आपल्या भाषणात योगाचे, प्राणायामाचे महत्त्व किती आहे ते चांगल्या प्रकारे पटवून दिले.
श्री अनिल कांबळे यांनी श्रद्धेय प्रकाशलालजी व त्यांच्या सोबत दोन मित्र तिघांनी मिळुन योगाचे भारतीय पध्दतीने शिक्षण घेतले व आज ४५०० शाखा देश विदेशात सुरू असल्याचे नमूद करून भारतीय योग संस्थानचे योगदान किती मोठ्या प्रमाणात आहे हे सांगितले.
श्री आनंद अग्रवाल यांनी दहा वर्षापूर्वी काळवणे सर व भाऊ सुरडकर सरांनी कशाप्रकारे छत्रपती संभाजीनगर येथे योग वर्ग सुरू केले, यांच्या प्रयत्नानेच आज शहरांमध्ये जवळपास 60 योग केंद्र चालू झालेले आहेत. यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचं फार मोठं सहकार्य लाभलेले आहे, याची माहिती सांगितली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री भाऊ सुरडकर, किशोर रायपूरकर, किशोर ताकसांडे, प्रदीप देशपांडे, सुधाकर मुळे, कविता नंदनवार, सुनीता कावळे, अपर्णा आहेर यांनी प्रयत्न करून हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व सुंदर आयोजन केला होता.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800