Sunday, June 22, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
जवळपास दोन आठवड्यांनी आपण भेटत आहोत. मध्यंतरी काही दिवस बाहेरगावी गेलो असल्याने तसेच वेळ न मिळाल्याने मागच्या मंगळवारी वाचक लिहितात…. हे सदर प्रसिद्ध करता आले नाही.

सध्या पाऊस तुफान पडतोय.
त्याच्या जोडीला वादळ वारे जोरात वहात आहेत. त्यामुळे फारच आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. या अवकाळी पावसामुळे शेतीचे किती नुकसान होत असेल याची कल्पना करवत नाही.असो.

आता पाहू या, गेल्या दोन आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ. (संपादक)

गोविंद पाटील यांच्या बालकवितेवर पुढील प्रमाणे प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.

१.
गोविंद पाटील सर अभिनंदन ! खूपच छान बालकविता.
— प्रवीण लोहार. जळगाव
२.
वा सुट्ट्यांसाठी प्रासंगिक..!
— बी. एन. चौधरी. धरणगाव
३.
खूपच छान….!
— सुरेश पाटील. एरंडोल, जळगाव
४.
मुलांसाठी म्हणून मनोरंजन करणारी बालकविता
— विलासजी मोरे. एरंडोल, जळगाव

सुंदर कविता
— शैलजा करोडे. नेरुळ, मुंबई
६.
प्रेरणा देणारी सुंदर कविता
— शाहीर निंबाबडगुजर एरंडोल.
७.
अतिशय आनंद देणारी कविता
— मिलिंद बागुल. जळगाव
८.
मुलांना आनंद देणारी बालकविता
— दिलीप पाटील. मुंबई पोलीस
९.
माधवी कुंटे यांची १०० पुस्तके… वाचूनच अफाट असे म्हणावेसे वाटले!
— नीला बर्वे. सिंगापूर

राधिका भांडारकर लिखित माझी जडणघडण भाग ४८ अभिप्राय…

खरोखरच बहुरंगी व्यक्तिमत्व आहे तुमचे राधिकाताई.👌
प्रत्येक रंगात तुम्ही पूर्ण बुडल्या ,, ते सर्व अनुभव घेऊन “”लेखिका “”झाल्या.
— छाया मठकर. पुणे

छानच गुरू मिळाले तुम्हाला. आणि तुमच्या प्रगल्भ बुध्दीमत्तेमुळे कोणतेही क्षेत्र असो तुम्ही उत्तम काम करत आलात हे खूप महत्त्वाचे आहे ..
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे

आजच्या भागातून मला तुझ्यातली लेखिका कळली.
लिहितेस तर तू सुंदरच!
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका

राधिकाताई, माझी जडणघडण चा वरील 48 नंबरचा भाग वाचला. ओघवती शैली आणि सहजसोप्या शब्दातून व्यक्त होणे या गुणांमुळे लेख छान उतरला आहे. मी तुमचे प्रारंभीचे बरेच भाग वाचले. नंतर वैयक्तिक समस्यांमुळे तुमचे लेख वाचू शकलो नाही. पण त्यामुळे काही बिघडत नाही. वरील लेख वाचून तुमची जडणघडण कशी झाली हे सहज समजते. रत्नाकर मतकरीं सारख्या माणसांचा सहवास हा तर मोठ्ठाच लाभ म्हणायचा ! आणि हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे की ‘वाचन जितके जास्त आणि वैविध्यपूर्ण’ तेवढे लेखन देखील वैविध्यपूर्ण होत जाते. अवतीभवती इतक्या असंख्य घटना / प्रसंग घडताना दिसतात की काय लिहू आणि काय नाही अशी गत होते. गूढ, विनोदी, गुन्हेगारी, सांसारिक, लैंगिक, भावनिक, क्रौर्य, प्रेम आणि अशा अनेक विषयांवर लेखन केले तर आपणच आपल्याला नव्याने भेटल्याचा साक्षात्कार होतो. असो. जडणघडण लिहित असतानाच तुमचे वैविध्यपूर्ण कथा/कादंबरी लेखन देखील चालू असू द्या. अर्थात दिवाळी 2025 च्या अंकांसाठी तुमचे लेखन चालू असेलच. त्यासाठी
— पुरुषोत्तम रामदासी. मुंबई

छानच 👌
— अस्मिता पंडीत. पालघर

वाह
क्या बात है..
कित्ती खरं खरं
— प्रा.सुमती पवार. नाशिक

खूप छान लिहून झाला आहे हाही भाग !
माझ्या मनातही नेहमी एक विचार येतो,तू जर डॉक्टर झाली असतीस तर एक उत्तम डॉक्टर झाली असतीस.कारण तुला माणसं छान वाचता येतात. त्या क्षेत्रातही तुला बँकेसारखीच भरपूर माणसे भेटली असती.
असो. रत्नाकर मतकरींसारखा गुरु तुला लाभला हे खरच भाग्य !!
— आरती नचनानी. ठाणे

खूपच सुंदर !
तुझ्या बॅन्केत आल्यावर तू मला मतकरी साहेबांची ओळख करून दिली होतीस. तेव्हा मला तुझा हेवा वाटला.
त्यानंतर तू मला त्यांच्या प्रत्येक नाटकाला घेऊन जायचीस. तेव्हा ठाण्यात नाट्यगृह नव्हतं. पण आपण धडपडत साहित्य संघ ला जायचो. तुझ्याबरोबर नाटक पाहण्यात वेगळीच गंमत. तू direction चे, dialogs चे बारकावे मला सांगायचीस. तिथेही तुझे सूक्ष्म निरीक्षण मला जाणवायचे.
नकळत माझीही जडण घडण व्हायची.
तुझी ही जडण घडण संपू नये असं वाटतं.
— अंजोर चाफेकर. मुंबई

देवेंद्र भुजबळ लिखित “लाखो पुरी सर हवेत !” या चरित्र पर लेखावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया. ..


मी पुणे विद्यापीठात शिकत असतांना पुरी सरांना ओळखत असे. आज किती वर्षांनी तुमच्यामुळे सरांची आठवण जाग्रुत झाली!
धन्यवाद.
— प्रा सुनीता पाठक. छ. संभाजीनगर.

पुरी सर आमच्या तालुक्याचे भूषण आहेत. अत्यंत विद्यार्थीप्रिय… तुम्ही म्हणता तसे आई मनाचा माणूसच आहेत. खुप छान लिहिले आहे….. 💐
— महावीर दुरुगकर.

लाखो पुरी सर हवेत.. फारच अप्रतिम लेख.
— प्रियंवदा गंभीर. पुणे

धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य! माननीय पुरी सरांबद्दल वाचले आणि मन भारून गेले आणि आदराने भरूनही गेले.
सारे कुटुंबच आदरणीय.
सरांना अमृत महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिवेत् शरदः शतम् !
🌿💐🌿
— नीला बर्वे. सिंगापूर

Good morning,
प्रा. सुरेश पुरी सर यांच्यावरील वाढदिवसाचा विशेषांक वाचला. तुमचा स्वतःचा लेख, संदीप काळे आणि वैजनाथ वाघमारे या दोघांनी केलेले अनुभव कथन आणि पुरी सरांबाबत त्यांच्या भावना लक्षात आल्या. त्यांच्या स्तुतीबद्दल जे लेख प्रसिद्ध केले, ते खूप चांगले केले, आनंद वाटला.
प्रा. पुरी सर चांगले आहेत. पण मला त्यांचा एक शिक्षक म्हणून नेहमीच आदर राहिला आहे. फारसा मी त्यांच्या अधिक जवळ गेलो नाही, अथवा मदत म्हणून कधीही त्यांच्यापर्यंत गेलो नाही. त्यांनी कदाचित मलाही तेवढे त्यांनी सहकार्य केले असते पण तेवढी गरज निर्माण झाली नाही. एकदाच विद्यापीठातील त्यांच्या घरी गेलो होतो, त्यानंतर नाही. पण सामाजिक जाण असणारा प्राध्यापक, माणूस म्हणून त्यांची प्रतिमा माझ्या मनात घर करून आहे.
मी काल त्यांना अमृत महोत्सवी वाढ दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. श्री. भुजबळ यांच्याकडून तुमचा नंबर घेतला तेंव्हा त्यांना खूप बरे वाटले. औरंगाबादला गेल्यावर भेटीसाठी निश्चित येईल, असे त्यांना बोललो. अनेकजण संपर्कात असतात पण तू नव्हता अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. असो, औरंगाबादला जाण्यासाठी तुमचा कार्यक्रम बनल्यास सांगावे म्हणजे मिळून जाता येईल आणि अनेकांच्या भेटी घेता येतील पण आताच नाही. दोन-तीन महिन्यांनंतर. गांधीनगरला येणे शक्य असल्यास अवश्य यावे.
— शेषराव वानखेडे. जेष्ठ पत्रकार,
१९८८- ८९. मास्टर्स बॅच

उमाकांत रासने अभिनंदन व नमस्कार।
— डॉ गोविंद गुंठे.
निवृत्त दूरदर्शन संचालक, नवी दिल्ली.

प्रा अनिसा शेख यांच्या आहेर लेखावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया…


वाह👌🏻आहेर…
— प्राची गडकरी. मुंबई
२.
आहेर : जबरदस्त लेख आहे.
— खाजा बागवान. पुणे
३.
मी newsstorytoday.com वर प्रसिद्ध झालेला “मराठी नाईटिंगेल :मीना घोडविंदे” या शीर्षकाखालील श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेला लेख वाचला. लेख मनाचा ठाव घेणारा ठरला. लेखातून मीना घोडविंदे यांचं आयुष्य आणि त्यांचं कार्य यांचं जितंभूत चित्र उभं राहिलं. समाजाच्या दुर्लक्षित आणि गरजू घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य केवळ कौतुकास्पद नाही, तर अनुकरणीय आहे.

मीना घोडविंदे यांचं कार्य म्हणजे माणुसकीचा खरा साज. त्यांनी आपल्या सेवाकार्यातून रूढी, परंपरा आणि सामाजिक बंधनांच्या पलीकडे जात अनेकांचे जीवन उजळवलं. त्यांच्या धाडसाने आणि सेवाभावाने त्या खरीखुरी ‘मराठी नाईटिंगेल’ ठरल्या आहेत.

श्री, देवेंद्रजी भुजबळ यांनी लेखाची भाषा स्पष्ट, समृद्ध आणि संवेदनशील मांडली आहे. घटनांची मांडणी काळाच्या प्रवाहात करण्यात आल्याने वाचकांना त्यांच्या आयुष्यातील टप्प्यांची समज सुलभतेने होते. सामाजिक कार्याला मानवतेच्या दृष्टिकोनातून भिडणाऱ्या मीनाताईंचं जीवन म्हणजे आधुनिक काळातील एक शांत क्रांतीच म्हणावी लागेल.

त्यांच्या वाटचालीतली प्रत्येक पायरी ही संघर्षाने, समर्पणाने आणि प्रेमाने भारलेली आहे. लेखात याचा उल्लेख अतिशय प्रभावीपणे करण्यात आला आहे. विशेषतः त्यांच्या रूग्णसेवेतील योगदानाची उदाहरणं मन हेलावून टाकणारी आहेत.

आजच्या काळात, जेव्हा समाजात करुणेचा अभाव जाणवतो, तेव्हा अशा व्यक्ती आणि त्यांच्या कार्याची ओळख करून देणारे लेख हे समाजमनाला जागं करण्याचं काम करतात. त्यामुळे अशा लेखनाचं महत्त्व अधिकच वाढतं.

लेखक श्री.देवेंद्रजी भुजबळ यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मीना घोडविंदे यांचं कार्य अधिक व्यापक स्वरूपात लोकांपुढे यावं आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळावी, हीच सदिच्छा.
— रमेश मारुती पाटील.
लेखन अन् मी साहित्य, कला प्रतिष्ठान कोल्हापूर
४.
उज्ज्वला केळकर यांनी अनुवादित केलेली गुजराती कथा खूपच हृद्य आहे. मनास भिडते. अनुवाद सहज सुंदर झाला आहे.
अपर्णा काकिर्डे बद्दल वाचून खूप कौतुक वाटले..छान, लोभस व्यक्तिमत्त्व… ओळख करून दिल्याबद्दल चित्रा ताईंचे आभार.
— स्वाती वर्तक. मुंबई

माझी जडणघडण भाग ४९ अभिप्राय

छान लिहिले आहेस..
‘जीजी ‘ पुस्तक तेव्हा मी वाचलं होतं.. छान च लिहिले आहेस आणि ते ‘आतून’ आलेले आहे.. त्यामुळे खरं आणि निर्मळ आहे..
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे

जीजी नेच जडणघडण केली तुमची.नसानसात आहे ती तुमच्या..
— सुमतीताई पवार. नाशिक

जीजी बद्दल कितीही वेळा वाचलं तरी ते नवीनच वाटतं.
तिची मायेची उब सतत बरोबर आहे असं वाटतं.
— अंजोर चाफेकर. मुंबई

जिजीच्या मायेचे पदर खूप सुंदर उलगलेत ताई 🙏जिजींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏
— अस्मिता पंडीत. पालघर

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on जिचे तिचे आकाश…: १३
सौ. सुनीता फडणीस on योग : काही कविता…
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश…: १३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on कर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे
ज्ञानेश्वर वि जाचक on करवंदे
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १२
अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?