सुप्रसिद्ध व्यसनमुक्त श्री दत्ता श्रीखंडे यांनी व्यसनमुक्त समाजाचा ध्यास घेतला आहे. त्यामुळेच ते जिथे जमेल तिथे सर्वांना व्यसनमुक्त होण्याचा, व्यसनमुक्त राहण्याचा सतत संदेश देत असतात. त्यासाठी स्वतः सक्रिय राहून कार्य देखील करीत असतात.

प्रसिद्ध लेखक श्री सुमेध वडावाला (रिसबूड) यांनी श्री दत्ता श्रीखंडे यांचे लिहिलेले “मिट्ट काळोख, लख्ख उजेड” हे चरित्र पर पुस्तक चांगलेच गाजले आहे. जेष्ठ समीक्षक श्री दिलीप गडकरी यांनी लिहिलेले या पुस्तकाचे समीक्षण आपल्या पोर्टलवर प्रसिद्ध झाले असून आपण ते पुढील लिंक वर क्लिक करून अवश्य वाचा.
*पुस्तक परिचय*
*“मिट्ट काळोख, लख्ख उजेड”*
✒️ दिलीप गडकरी.👇
https://newsstorytoday.com/पुस्तक-परिचय-16/
श्री दत्ता श्रीखंडे नुकतेच पत्नी सौ राधा समवेत केदारनाथ यात्रेला गेले होते. तिथे सुद्धा प्रसिद्ध यू ट्यूबर ने त्यांची मुलाखत घेतली असताना तिथेही व्यसनमुक्तीचा छान संदेश देऊन आपले परम कर्तव्य पार पाडले आहे. हा व्हिडिओ आपण नक्की पहा.
पुणे येथील मुक्तांगण आणि इतरही काही संस्था, व्यक्ती समाज व्यसनमुक्त व्हावा आणि रहावा यासाठी प्रयत्नशील आहेत. पण ही समस्या आटोक्यात येण्याऐवजी दिवसेंदिवस भीषण रूप धारण करीत आहे. त्यामुळे व्यसनमुक्तीच्या या प्रयत्नांमध्ये तुम्हा आम्हा सर्वांची साथ असणे अत्यंत आवश्यक आहे. “एक दिलाने प्रयत्न करू या व्यसनमुक्त समाज घडवू या”

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800