“सातारा” म्हणता डोळ्यापुढे अख्खा इतिहास उभा राहतो. सैनिकांच्या शौर्यगाथेमुळे अभिमानाने आपली मान उंचावते.
“सातारा” सैनिकांची भूमी म्हणून नाव लौकिकास आहेच पण हे निसर्गरम्य ठिकाण सातासमुद्रापलीकडे ओळखले जाऊ लागले ते म्हणजे आधी कंदी पेढे यांच्यामुळे आणि आता “सातारा हिलहाफ मॅरेथॉन “मुळे !!
या मॅरेथॉनची दोनदा “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” ने दखल घेतली आहे.या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातल्या काही अवघड मॅरेथॉन पैकी ही एक समजली जाते. कारण या मॅरेथॉनचा मार्ग यवतेश्वर घाटातून जातो, जो चढायला फार कठीण आहे. इथे चांगल्या चांगल्या स्पर्धकांचा कस लागतो. पण उत्कृष्ट नियोजन, निसर्गरम्य वातावरण आणि सातारकरांचे प्रोत्साहन या सर्व बाबी स्पर्धकांसाठी “एनर्जी ड्रिंकचे” काम करत. घाटातून जातना अधूनमधून नैसर्गिक वाहणारे धबधबे स्पर्धकांना थंडावा देतात.
या दिवशी रस्त्यावर स्पर्धकांच्या रुपामध्ये जनसागर ओसंडून वाहताना आपल्याला अनुभवायला मिळतो. हे दृश्य अत्यंत विलोभनीय व मनाला आनंद देणार असत. नियोजित रस्त्यावर दुतर्फा ढोल ताशे, पोवाड्यांनी संपूर्ण वातावरण जोशमय झालेलं असतं. हा दिवस सातारकरांसाठी कुठल्याही सणापेक्षा कमी नसतो. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर मेडल गळ्यात पडल्यावर स्पर्धेचा थकवा क्षणात नाहीसा होतो. या मेडलमध्ये सुद्धा साताऱ्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे प्रतिबिंब पाहण्यास मिळत.
“सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे” संस्थापक डॉ. श्री संदीप काटे यांनी ही स्पर्धा दीडशे स्पर्धकांपासून सुरू केली होती. यंदा या स्पर्धेचे तेरावे पर्व होते.
अशी ही मॅरेथॉन नुकतीच रविवार दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी दिमाखात पार पडली. खासदार उदयनराजें भोसले यांच्या उपस्थितीत सकाळी ६.३० वाजता पोलीस कवायत मैदानापासून स्पर्धेला सुरुवात झाली. यावर्षी देश विदेशातील तब्बल ८००० स्पर्धकांनी भाग घेतला होता.
यंदा जरी मी बघ्यांच्या गर्दीत असली, तरी पुढच्या वर्षी मात्र स्पर्धकांच्या वर्दीत राहील, असा मनोमनी मी निश्चय केला. ही स्पर्धा पाहताना सुद्धा मी धावत असल्याचा अनुभव घेतला कदाचित यालाच “एनर्जी ट्रान्सफर” म्हणत असतील आणि म्हणूनच म्हणावसं वाटतं, साताऱ्याची आन-बान शान, सातारा हिल हाफ मॅरेथॉन” !!!!!
— लेखन : सौ. आश्लेषा गान. सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खुप छान लेख आणि महत्व पुर्ण इतिहास.
साताऱ्याच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा! वाह!
150 स्पर्धक ते 8000 स्पर्धकांचा प्रवास फक्त 13 वर्षात, वाखाणण्याजोगे आहे।
महत्वपूर्ण माहिती.
सातारा हा सैनिक भरती साठी प्रसिद्ध आहे हे माहीत होते पण मॅरेथॉन बद्दल आजच माहिती पडले. खूप छान लेख लिहिलंय सातारा बद्दल
सातारा हिल ऑफ मॅरेथॉन या स्पर्धाची माहिती मला नव्हती त्याबद्दलचे वर्णन वाचुन आपणही यात सहभागी व्हावे असे वाटायला लागले…. माहितीत नवीन भर पडली… धन्यवाद आश्लेषा….