कुळगाव-बदलापूर दिव्यांग विकास संस्थेचा 26 वा दिव्यांग आनंद दिवाळी मेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्याच्या प्रमुख पाहुणे पदी कुळगाव- बदलापूर नगरपरिषद दिव्यांग पुनर्वसन अधिकारी श्रीकांत निकुळे आणि विशेष पाहुणे पदी रोटरी क्लब ऑफ मुंबई डाऊन लाईन सी लँड चे नवनिर्वाचित प्रेसिडेंट रोटरीयन रामूशेठ गडकर तर अध्यक्षस्थानी कुळगाव-बदलापूर दिव्यांग विकास संस्था चे संस्थापक महासचिव अनिल चाळके स्थानापन्न होते.
प्रारंभी बाळकृष्णच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्रीकांत निकुळे आणि रामूशेठ गडकर यांनी समयोचित भाषण केली.

अनिल चाळके यांनी अध्यक्षीय भाषणात दोघांच्या कार्याचा गौरव करून त्यांना ऑक्सिजनरुपी तुळशीची रोपे आणि ज्ञानरुपी पणती देऊन सत्कार केला.

उपस्थित दिव्यांग बांधवांना अनिल चाळके, रामूशेठ गडकर, मयुरा सैदम यांच्यावतीने दिवाळीचा फराळ आणि पणती देण्यात आली.
उल्लेखनीय कार्याबद्दल सुरेश पाटील, प्रज्ञा कांबळे. राकेशमामा चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
