Homeसाहित्यमी आणि निसर्ग

मी आणि निसर्ग

मी आणि निसर्ग बसलो
नदीच्या आल्याड पल्याड
काय तुझे हे सतत चे बदल
म्हणून मीच त्याच्यावर बरसलो…..

एक उसासा घेत त्याने मला पाहिले….
गार ढगाचे एक सावट माझ्या माथी आले
का चिडतो इतका काही चुकले का माझे
निसर्गाने त्याला अगदी सहज पुसले?..
बाप म्हणवतो स्वतःला तरी इतका निष्ठूर कसा
हरवून टाकलेस ऋतू सारे आणि इथे विसावला असा…

गंमत सऱ्या ऋतूंची नष्ट तुम्ही केली
वसंतातल्या माझ्या नवीन पालवीची
देणगी तुम्हीच तर झिडकारली….
ग्रीष्माला आणून मी सारे निसर्ग चक्र चालवतो
तुम्हालाच नाही तर बाकी साऱ्यांना पिळवटून टाकतो

अलगद साऱ्यांची कोरड मी वर्षा ऋतूने भागवतो
ग्रीष्म आणून मी पुढच्या पिढीची तयारी करतो
बाप आहे म्हणून पुढचा विचार करतो
शारदा मध्ये भेट साऱ्यांना मी निरभ्र आकाशाची करतो
गळालेली पाने मी सोबत घेऊन जातो …
हेमंताची गरिमा काही औरच आहे
गुलाबी थंडीचे पांघरूण सऱ्या निसर्गावर आहे ….

शिशिरामध्ये मी खुंटवून टाकतो सारे
आराम हवा थोडा म्हणून स्वतःलाच गोठवतो हे मात्र खरे…..
कोण म्हणतं मी केले बदल ….
बाप आहे ना म्हणून घडवतो आहे अद्दल…..
निसर्ग…..

सायली विघ्नेश शेंडे.

— रचना : सायली शेंडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments