Monday, February 16, 2026
Homeबातम्यामी, पोलीस अधिकारी...

मी, पोलीस अधिकारी…

राज्यपालांच्या हस्ते “मी, पोलीस अधिकारी”
प्रकाशित होणार

महाराष्ट्र पोलीस दलात महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून थेट भरती झालेल्या, घरात उच्च शिक्षणाची, नोकरी करण्याची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या, एका गावातून आलेल्या पहिल्या बॅच च्या पोलीस अधिकारी तथा निवृत्त पोलीस उपअधीक्षक सुनिता नाशिककर यांनी लिहिलेल्या आणि न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन ने प्रकाशित केलेल्या “मी, पोलीस अधिकारी” या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल, श्री रमेश बैस यांच्या हस्ते मंगळवार दि.१६ मे २०२३ रोजी राजभवनात होणार आहे.

ज्या काळात गावातील महिला नोकरीच करायच्या नाहीत तर शहरी महिला नर्स, शिक्षिका, कारकून अशा प्रकारच्या सुरक्षित नोकऱ्या करायच्या त्या काळात पोलीस दलात दाखल होण्याचे धाडस कसे केले, पुढे कठोर प्रशिक्षण आणि अत्यंत धडाडीने, प्रसंगी जीवावर उदार होऊन, प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असताना आलेले अनुभव या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत.

यापूर्वी न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन ची सौ वर्षा महेंद्र भाबळ लिहित “जीवन प्रवासआणि सौ रश्मी उल्हास हेडे लिखित “समाजभूषण २” ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. खूपच छान…!
    मनापासून अभिनंदन…!!!
    … प्रशान्त थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
    9921447007

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11