Sunday, October 19, 2025
Homeयशकथाकौतुकास्पद न्यूज स्टोरी टुडे

कौतुकास्पद न्यूज स्टोरी टुडे

प्रिय श्री देवेंद्र व सौ अलकाताई भुजबळजी,
सप्रेम प्रणाम.

१.
दोन तीन प्रदीर्घ पानांच्या पुस्तकांच्या वाचनामुळे “न्युज स्टोरी टुडे” वेबपोर्टलला चौथ्या वर्षाच्या यशस्वी पदार्पणाबद्दल आपले मनस्वी अभिनंदन करण्यात काहीसा उशीर झाला, त्याबद्दल प्रथम क्षमस्व !

२.
जनमत घेऊन अप्रतिम मिडिया संस्थेतर्फे विकास पत्रकारितेत अत्यंत मानाचा चौथास्तंभ पुरस्कार मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते आपणास मिळाला. हा एकच पुरस्कार जरी गृहित धरला तरी पोर्टलचे सुयश असाधारण निर्मिती कौशल्य व उत्कृष्ट संपादनाचे आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. या पोर्टलवर “मी वाचलेलं पुस्तक” याचा थोड्या शब्दात परिचय करुन देतो, याचा मला विशेष आनंद झाला.

३.
आपल्या वेबपोर्टलला वरील पुरस्कारा बरोबरच ‘एकता’ पुरस्कार, पुरोगामी विचाराचा पुरस्कार, माणूसकी सेवा गौरव पुरस्कार, मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळाचा सन्मान पुरस्कार आणि पोर्टलच्या सुविद्य निर्मात्या सौ अलकाताई भुजबळ यांना मानाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला याचा मलाच काय देशविदेशातील सर्वच वाचकांना, लेखकांना अतिशय अभिमान वाटतो
४.
२२ जुलै च्या पोर्टल मधील न्यूज स्टोरी टुडे पोर्टलमधील सर्व बाबींचा आढावा घेणारा देवेंद्रजींचा लेख, तसेच मेघना साने,
डॉ भास्करराव धारावकर, वर्षा भाबल, पुर्णिमा शेंडे, नीता देशपांडे, मंदा शेटे, यांचे पोर्टलच्या यशकथा सांगणारे लेख तर आवडलेच आणि याच विषयावरील रश्मी शेंडे, शोभा कोठावदे, सुरेखा रासने यांच्या कवितां छान वाटल्या.


पोर्टलचे उत्कृष्ठ संपादन कौशल्याबद्दल देवेंद्रजींचे व निर्मात्या सौ अलकाताईंचे या निमित्ताने मनापासून अभिनंदन करतो आणि चौथ्या वर्षाचे सहर्ष स्वागत करतो.
धन्यवाद.

सुधाकर तोरणे

— लेखन : सुधाकर तोरणे
निवृत्त माहिती संचालक. नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. News story today या पोर्टल या परिवाराचा सभासद म्हणून या पोर्टलला जी लोकमान्यता मिळते याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो.
    उत्तमोत्तम साहित्य आणि लोकाभिमुख उपक्रम/ योजना सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे ते आदर्श व्यासपीठ आहे.अभिनंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप