विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानातील उच्चशिक्षणाच्या संधींविषयी माहिती मिळावी, या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेने रविवार, दि. १० मे २०२६ रोजी ‘मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधी” हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
८ वी ते १२ वीचे विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी विनामूल्य. मात्र नाव नोंदणीसाठी आवश्यक असलेला हा कार्यक्रम सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत होणाऱ आहे. या कार्यक्रमात डॉ. प्रशांत रत्नपारखी (जैवविज्ञान), प्रा. अनुश्री तांबे (गणित), डॉ. अनंत कापडी (रसायनशास्त्र) डॉ. श्रीगणेश प्रभू (भौतिकशास्त्र) हे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. प्रत्येक सत्रानंतर विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे निरसनही असेल.
स्थळ : मराठी विज्ञान परिषद,
वि.ना.पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी,
मुंबई – ४०००२२.
मो. ९९६९१००९६१
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
