Homeसाहित्यनाग नाग ..

नाग नाग ..

आज नागपंचमी आहे. त्यानिमित्ताने पुढील कविता प्रस्तुत करीत आहे.
नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

नागपंचमी सणआला
भाऊ मानते नागाला
भारतीय महिलाप्रगत
संस्कृती सांगे जगाला

साप नाग मित्र सगळे
हवेआतां वाचवायला
निमीत्ते नाग पंचमीचे
सत्य मिळे सुचवायला

नाग दूध पीत नाहीत
थांबवा त्यांचे छळाला
धोका असे माणसांचा
मूकप्राणी लागेगळाला

नाग डसत नाही मुळी
आणतोत्याला रागाला
शेपटी वरती देतो पाय
सामोरो जावे भोगाला

विषारी आम्ही माणसे
उद्युक्त करतो डसायला
नाग डूक धरत नसतो
विश्वास हवा बसायला

जगू देऊनि दुस-याला
शिकू आपण जगायला
सणाचे सत्व तत्वजाणं
सांगते नीट वागायला

नाग सर्प विषग्रंथीतूनि
औषध लाभले जगाला
आपण मारतो नागाला
तोच शिकवी जगायला

हेमंत मुसरीफ

— रचना :- हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vedvati Kulkarni on खरा डॉक्टर
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on प्राणांचे झुंबर…
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on आम्ही सिद्ध लेखिका : ठाणे, पुणे वृत्तांत
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on सुभाषित विवेचन : 2