१५वे स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलन भूतान येथील थिंपू या राजधानीत, येत्या २ ऑक्टोंबर रोजी होत आहे.

या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक सुधीर सेवेकर, स्वागताध्यक्ष सावरकरांच्या पत्रकारितेचे अभ्यासक तथा निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, संमेलनाचे निमंत्रक भाऊ सुरडकर, कार्याध्यक्ष स्नेहल पाठक, भूतानच्या राज परिवारातील सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत.

सावरकरांच्या अनेक पैलूंवर मान्यवरांचे लेख असलेल्या,
* स्मरणिकेचे प्रकाशन,
* देवेंद्र भुजबळ यांच्या “झेप”,

* शैलजा देशपांडे यांच्या “अनादि मी”
या पुस्तकांचे प्रकाशन या वेळी होणार आहे.
संमेलनाची काही वैशिष्ट्ये :
** एका परिसत्रात ज्येष्ठ साहित्यिका प्रा. स्नेहल पाठक ह्या स्वातंत्र्यवीर सावरकर कुटुंबातील “तीन अग्निशिखा” हा विषय मांडणार आहे.
** अस्मिता शिंगोटे ह्या स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळ, पांढरकवडा या शाखेची वाटचाल सांगणार आहेत.
** ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक वाकोडकर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्रकारिता हा विषय मांडणार आहे.
** प्राध्यापक रवींद्र मगर यांच्या पुढाकाराने एका मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
** विदर्भातले सुप्रसिद्ध गझल गायक सुरेश दंडे यांचे गायन होणार आहे.
** या संमेलनामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नांदेड, जळगाव, धुळे, यवतमाळ, बीड, पांढरकवडा, चाळीसगाव अशा विविध ठिकाणावरून १३० सावरकर प्रेमी उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाच्या आयोजनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळाचे किरण सराफ, सुभाष कुमावत, विजय जहागीरदार, यांचे मोठे योगदान लाभले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळ, छत्रपती संभाजी नगर, गेल्या 30 वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संमेलनाचे आयोजन करीत आलेले आहेत. या अगोदर छत्रपती संभाजीनगर, अंदमान, मॉरिशियस, श्रीलंका, लंडन, सिंगापूर, जपान, इंदोर, हम्पी, भगूर नाशिक, मेळघाट अशा अनेक ठिकाणी संमेलनाचे आयोजन केले होते. स्थानिक लोकांचा त्यामध्ये मोठा सहभाग रहातो. आपल्या भारताची संस्कृती, क्रांतिकारकांचे योगदान असे विषय या संमेलनाच्या माध्यमातून मांडल्या गेलेले आहेत.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
