Homeसाहित्यबाप्पा

बाप्पा

बाराक्षरी काव्य रचना

माझ्या मनातील बाप्पा लंबोदर
वक्रतुंड नाम शोभे खरोखर
प्रारंभी विनती तुजला करतो
रूप भाग्यवान दिसे मनोहर

मुषकी वसे घेऊन लगामास
विश्वे सुख दुःख घेई लंबोदर
नेत्र नाजुकशी अचुकता छान
दिव्य दृष्टी सामावते खरोखर

बाप्पा विनवती भक्त जन सारे
नच व्हावे मुर्तीचे अवडंबर
साऱ्या विश्वाचा तू ब्रम्हांडनायक
जाणीतो विश्व कल्याणाचे प्रहर

तुज नको सोने चांदी अलंकार
भक्ता मुखी हवा जयजयकार
पत्र,पुष्प,फल निसर्ग निर्मित
नामस्मरण करावे हो त्रिवार

ढोल ताशा नको ध्वनी प्रदुषण
कर्कश आवाज बेगडी ते नृत्य
हवे स्तोत्र स्तवन गायन नवे
दश दिनी‌ कार्य व्हावे मुखी स्तुत्य

शोभा कोठावदे

— रचना : सौ.शोभा‌ कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments