Homeसाहित्यभूतान : काही कविता

भूतान : काही कविता

१) “अंतःकरणाचे ठोके”

निसर्गाला भेटू या — स्वतःला शोधू या —
आणि नव्या क्षितिजाकडे सुंदर प्रवास करूया
अन् भारत मातेचे स्वप्न साकार करू या
असे गुणगान करणारा भूतान देश
भारत – भूतान नावातच ‘भ’ आहे समान
दोघांची मैत्री आहे महान !
भूतान पर्वत साद घालतात तेव्हा
मन जाते लहान बाळी सारखे धावत धावत !
त्यांच्या दर्शनानेच पूर्ण होतात आशा – आकांक्षा
खळखळ वाहणारी नदी
मन माझे स्थिर नाही ठेवत
म्हणून तिचे गुणगान करण्यासाठी
शब्द निःशब्द होतात.
भूतान भारतमातेचे गुणगान गातो
तेव्हा अंतःकरणाचे ठोके होतात श्रेष्ठ !
भारत माता आहे ज्येष्ठ !

— रचना : शैलजा विष्णू देशपांडे – अभ्यंकर.

२) मित्र देश

हिंदुस्थान – भूतान
देश विदेश
शिक्षण – के साथ सोच
प्रति अदान -प्रदान
शिक्षण शालेय
महाविद्यालयीन
आगे है स्त्री संतान
जल, कृषी, विज्ञान
टुरिंग प्रति धीरे धीरे
प्रगती कर रहा है भूतान,
सपोर्ट है हिंदुस्थान
हो रही है इस के प्रति टुरिंग
लोग में अदान – प्रदान
ह्यापीनेस, साफ सुथरा
विचार रख के
टुरिंग को दे के महत्व
हो के स्ट्रॉंग
चर्चा कर के
सामने है हिंदुस्थान
लगा रहा है इस प्रति
हर इन्सान
यही है आन बान शान
ले के हिंदुस्थान – भूतान
अपनी ओर से कर के
पुरी कोशिश
जग के सामने रख
के ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान
चला के, दिखा के,
समझा के अपना सम्मान
स्वच्छ, सुंदर बिना प्रदूषण
विचार में
देश, मित्र देश, टुरिंग लोग
आने -जाने के प्रति
जागतिक स्तर के प्रति
सुबह – श्याम – रात
कोशिश में जुड रहा है भूतान
सच्चा मित्र हिंदुस्थान

— रचना : प्रमोद तोरवी.

3) भूतान

मला सांगा, भूतान म्हणजे काय असत
भारताचा शेजारी अन् समाधानाचा आगार असत.
रस्ते स्वच्छ, निर्मळ, केरकचरा डब्यात
आत बाहेर स्वच्छतेची हमी
कार्बन शुन्य, पाणी स्वच्छ निर्मळ
धोका नाही, प्रदुषण शुन्य असत. ॥ १ ॥

घनदाट जंगल, दाट वनराई मधुन रस्ते
वळणाचे वळणे घाबरायचे नसतं ॥ २ ॥

माणसं साधी जगावेगळी
सारखं कामच काम करायचं असतं
सुखाने जगायचे असतं. ॥ ३ ॥

वाहत्या नद्या, भरपूर पाणी
पाणी आडवून पाणी जिरवून
विज निर्मीतीचे लक्ष साध्य करायचं असत. ॥ ४ ॥

खळखळत्या नद्या, हिरवी वनश्री
हिरवे डोंगर, हिमाच्छदीत शुभ्र शिखरे
समाधानी मानस, आदरातिथ्यशील अन् सुखी
आनंदाने भारताशी मैत्रीत राहायचं असतं. ॥ ५ ॥

मेहनती माणसं देखणी सुंदर
पाहुणचारा सदैव तत्पर
भारताशी मैत्री, कृतज्ञता
छोटा भाऊ मोठा भाऊ
म्हणून मिरवायच असतं. ॥ ६ ॥

बौद्ध धर्म अतुट श्रद्धा,
राजावर विश्वास, शुध्द परंपरा
प्रेम बंधन अधिकाराने
सगळ्यांनी नीट वागायच असतं. ॥ ७ ॥

–– रचना : प्राचार्य डॉ. नारायण कोळे. बीड, महाराष्ट्र.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments