Homeसाहित्यकविता : वाचन प्रेरणा दिन

कविता : वाचन प्रेरणा दिन

15 आक्टों.वाचन प्रेरणा दिन
डॉ.अब्दुल कलाम जयंती दिन
देशासाठी अर्पिले जीवन
शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण

गरीबीशी दोन हात करीत
घडविले स्वतः चे शिक्षण
‘ प्रयोग शाळा ‘ हाच संसार
राष्ट्रासाठी झिजले आयुष्यभर

अंतराळी कोरले स्वतःचे नाव
इतिहास घडविला ‘ मिसाईल मॅन ‘
अखंड संशोधन,संरक्षण,शिक्षण
महान वैज्ञानिक जगात अमर

‘ स्वप्नं पाहा ‘ जागविला तरुण
चैतन्याचा चेतविला जागर
एक राष्ट्रपती लाभला देशास
“भारत रत्न” सन्मान अजरामर…

— रचना : काव्य प्रभा.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments