Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
दिवाळी होऊन गेली, तरी आपल्या मनातून ती काही लगेच जात नाहीत. दिवाळीचा दरवळ पुढे काही काळ राहतोच. त्याचे प्रत्यंतर आजच्या पोर्टल मध्ये दिसेलच. असो.

सध्या विचित्र वातावरण असल्यामुळे आपण सर्वच जण वैतागलो आहोत. पाणी टंचाईची भीषण समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत आपण निदान काटकसरीने पाणी वापरण्याचा संकल्प करू या. आज वाचवलेले पाणी आपल्यालाच उद्या कामात येणार आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. माणसाने कितीही प्रगती केली असली तरी अजूनही पाणी निर्मिती काही, माणूस करू शकलेला नाही. त्यासाठी निसर्गावरच पूर्णपणे अवलंबून राहावे लागत आहे.
आता वाचू या, वाचकांच्या प्रतिक्रिया.
धन्यवाद.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)

1
झेप च्या झेपेसाठी.. अभिनंदन.

खरे आहे….
ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळावी पण सरसकट देऊ नये. ज्यांना खरेच मिळत नाही किंवा अगदी चणे फुटाणे सारखी मिळते त्यांनाच द्यावी

वेध दिवाळीचे ..
कविता वाचनीय आहे.

अरे संसार संसार …
सद्य परिस्थितीत अत्यंत गरजेचे.छान उपक्रम चालू आहे. धन्यवाद आणि अभिनंदन. आपण केलेल्या सेवेमुळे एकास जरी फायदा झाला तरी सार्थक होते, असे बर्नार्ड शॉ चे म्हणणे होते. आपण कार्य करीत राहावे.
मी बुद्ध शोधतो आहे… सुरेख कविता.
— स्वाती वर्तक. मुंबई
2.
☘️🙏🏼🙏🏼🌹💐 श्री व सौ. भुजबळ दांपत्यांचे व टीम एन.एस.टी. यांनी साहित्य क्षेत्रातील विविध उपक्रमांत भरारी घेत उत्तुंग यशाची .. झेप.. यशस्वी केली आहे त्या सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…
— रंजना मांगले.
3.
सर नमस्कार,
‘अरे संसार संसार’ प्रा.डाॅ. अशोक वाकोडकर यांची ‘कौटुंबिक प्रकरणांसाठी ‘समुपदेशक’ म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने केलेली नियुक्ती किती सर्वार्थाने सार्थ आहे हे त्यांनी सहाशे कुटुंबांचे प्रबोधन करून न्यायालयात जाण्यापासून परावृत्त केले यावरूनच लक्षांत येते. आजकाल प्रत्येकाचा अहंकार एवढा वाढलेला आहे की, त्यांना फक्त स्वतःचेच ऐकायचे असते. ‘हम दो और हमारा एक’ या कुटुंब व्याख्येमुळे तर घरातील अनुभवी व्यक्तींची गच्छंती झाली असल्यामुळेच वादावादी, कलह, घटस्फोट इ. प्रकरणे वाढीस लागली आहेत.
प्रा.डाॅ. वाकोडकर सरांना या अत्यंत महत्त्वपूर्ण सामाजिक योगदानासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
4.
डॉ. सुलोचना गवांदे यांची मुलाखत छान झाली.
प्रश्नही अत्यंत उपयुक्त, योग्य होते. डॉ. सुलोचना यांनी खुप छान माहिती दिली. मन:पूर्वक आभार 🙏
— शुभदा डावरे चिंधडे. ठाणे
5.
श्री. सुरेश पोटे जी….
आपली मुलाखत पाहिली. फेस्काॅम या आपल्या जीवाभावाच्या संघटनेबद्दल आपण खुपच भरभरून बोललात. फेस्काॅमची स्थापना, अंगीकृत उद्दिष्टं, ज्येष्ठांचे उर्वरित आयुष्य सुखी, समाधानी, निरामय, आरोग्यमय व सन्माननाने जावो यासाठी केंद्र व राज्य सरकारचे धोरण, राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना मिळत असलेल्या आर्थिक लाभाच्या शासकीय योजना, आरोग्याच्या, एसटी महामंडळाकडील प्रवासातील सवलती. ज्येष्ठांसाठी उपयुक्त कायदे, क्रृतिशील व्रृद्धत्व, नॅशनल हेल्पलाईन फॉर सिनिअर सिटिझन्स 14567..सर्व काही मुद्दे व्यवस्थित मांडले व फेस्काॅमच्या कार्याची ओळख करून दिली..हे सर्व लगन, अभ्यास व संघटनेप्रतीचा भावनिक जिव्हाळा या मुळेच शक्य झाले. खुप खुप धन्यवाद व पुढील दैदीप्यमान वाटचालीस हार्दिक मंगलमय शुभेच्छा…
— अरुण माधव रोडे. माजी अध्यक्ष, फेस्काॅम महाराष्ट्र..🙏🙏

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments