Homeसाहित्यगुलाब फुला रे...

गुलाब फुला रे…

गुलाब फुला रे गुलाब फुला,
आनंद देतोस मनामनाला

झाड तुझे हे छोटे काटेदार,
पाने याची ही हिरवी हिरवीगार.

फुलतोस तू तर विविध रंगात,
आनंद भरतोस साऱ्यांच्या मनात.

लाल, गुलाबी, पिवळा अन् पांढरा,
जांभळा, निळा हा रंग तुझा साजरा.

काट्यांवरती फुलतोस तू परी,
हसत राहतोस रे दिवसभरी.

काय आहे तुझे हे गोड गुपित?
सांग ना सख्या, तू माझ्या कानात.

पाकळ्या मऊ जणू रेशमापरी,
सुगंध तुझा हा दरवळे घरीदारी.

देवघराची तू शोभा वाढवतोस,
लग्न मंडपात दिमाखात मिरवतोस.

प्रेमाचे प्रतीक तू खासच असतोस,
लहान बाळाचा मित्र शोभतोस.

उन्हा-पावसात डुलतोस छान,
पाहून तुला रे हरपते भान.

काट्यांत फुलूनही हसतच राहतोस,
म्हणूनच फुलांचा राजा तू शोभतोस !

आशा रेखा

— रचना : आशा रेखा. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments