कलेविषयी माहिती देणारा ज्ञानकोश म्हणजे आर्टीपेडिया !!!!!
तसेच पण कलेविषयी म्हणजेच परफॉर्मिंग आर्ट विषयीचे विनामूल्य माहिती संकलन किंवा इंटरनेटवरचा कलाविषयक ज्ञानकोश म्हणजे मीटकलाकार आर्टीपेडिया असे म्हणता येईल.
या कलाविषयक लेखांमुळे वाचक आणि परफॉर्मिंग आर्टिस्ट विद्यार्थ्यांना त्या माहितीचा बराच फायदा होईल.
मीटकलाकारने आर्टीपेडिया का तयार केला तर झटपट रेडी रेफरन्स म्हणून काम करण्यासाठी, तुमच्या आवडीच्या कलेची पार्श्वभूमी व इतिहास त्याची माहिती, परफॉर्मिंग आर्ट्स मधील विविध संकल्पना -शास्त्रीय संगीत- घराणे म्हणजे काय ? थाट म्हणजे काय ? घराण्याचे संस्थापक कोण ? विविध राग त्यातले काही रेअर राग म्हणजेच लुप्त होत जाणारे राग.
यामध्ये आम्ही विविध मराठी-हिंदी गाणी पण द्यायचा प्रयत्न केला की जे कोणत्या रागावर आधारित आहे असा नेहमी प्रश्न पडतो, त्याचे उत्तर या काही लेखांमध्ये तुम्हाला मिळेल.
संगीत आणि नृत्य या विविध प्रकारांची माहिती !! नृत्य म्हटलं तरी त्यांचे शास्त्रोक्त प्रकार सात-आठ आहेत. इतर लोकसंगीत नृत्याचे, विविध प्रदेशानुसार लोकनृत्य, लोकसंगीत दुर्मिळ होत जाणारे काही नृत्यप्रकार याविषयी प्रबोधन करणारे लेख आहेत.
वाद्य म्हटलं तरी वाद्यांमध्ये बरेच प्रकार असतात जसे की तालवाद्य, सुषिरवाद्य, तंतुवाद्य या आणि अशा विविध भारतातील आणि परदेशातील सुद्धा वाद्यांचा संगम आपण या आर्टीपेडियामध्ये करणार आहोत. यामध्ये पण वेगवेगळ्या प्रदेशांमधील वाद्य पण वेगवेगळी असतात तर काही दुर्मिळ वाद्य आहेत त्याविषयी पण आम्ही माहिती देण्याचा आणि संकलन करण्याचा लेख लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भारतीय कला विषयक जीवन कसे असते, विविध कलाप्रकार कोणते आहेत, या कलाविषयक ज्ञानाचा जगभरात प्रसार करण्यासाठी हा आर्टीपेडिया- कला ज्ञानकोश तयार करतो आहोत.
या कलेविषयी ज्ञान कोशांमध्ये सतत नवनवीन अपडेट होत असते. संकलन पूर्ण करताना बऱ्याच कलाकारांनी पण आम्हाला सहकार्य केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद !!
पुढच्या शनिवारी पासून प्रत्येक शनिवारी या ज्ञानकोशामधील एक भाग घेऊन, शास्त्रोक्त संगीतातील थाट म्हणजे काय, राग म्हणजे काय अशा विविध गोष्टींवर राग-लेख-माला सुरू करत आहोत.
आपल्याला ही लेखमाला निश्चितच आवडेल, उद्बोधक ठरेल, अशी आशा आहे. आणि अर्थातच आपल्या सुचनांचं स्वागत आहे.

– लेखन : प्रिया मोडक.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
🌹खूप छान माहिती 🌹
नवीन पिढीला प्रेरणादायी
🌹🌹
अशोक साबळे
Ex. Navy अंबरनाथ
Farah chhan , stutya upakram, khup mahiti yatun milu shakel.
Nice
Meetkalakar Team is a platform for all art lover..
Art a skill or something that needs skill..
Thank you