डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अर्थशास्त्र प्राध्यापक प्रा. डॉ बाळासाहेब सराटे यांनी नुकतीच इ 12 वी साठी लागणारी, NEET, CET प्रवेशपरीक्षेसाठी लागणारी तसेच महामानवाची चरित्रे असणारी विविध 100 राजीव गांधी कनिष्ठ महाविदयालय, राजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविदयालय घोडेगाव यांना भेट म्हणून दिली.

डॉ. प्रा .बाळासाहेब सराटे यांनी विद्यार्थ्यांशी शिक्षणाच्या नविन संधी, करियर मार्गदर्शन याबाबत चर्चा केली.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री साईनाथ पाटील जाधव यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन डॉ. बाळासाहेब सराटे यांचा सत्कार केला.
यावेळी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
