गेली ५ वर्ष न्यूज स्टोरी टुडे पोर्टल ची निर्मिती करणाऱ्या सौ अलका भुजबळ यांनी, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत, वयाच्या ६२ व्या वर्षी नुकतेच न्यूज स्टोरी टुडे यू ट्यूब चॅनल सुरू केले आहे. या बद्दल त्यांचा सानपाडा जेष्ठ नागरिक संघाच्या मासिक आनंद मेळ्यात संघाचे अध्यक्ष मारुती कदम, संघाच्या उपाध्यक्षा डॉ विजया गोसावी आणि दुसऱ्या जेष्ठ सदस्या भानुमती शाह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://www.youtube.com/@nstorytoday
किंवा
https://www.youtube.com/@newsstorytoday1 ही लिंक आहे यूट्यूब चॅनेल ची आणि पहिला एपिसोड “आईपण चा असामान्य प्रवास” https://youtu.be/t0cwGU407Q0 या यू ट्यूब लिंक वर पाहू शकता.
न्यूज स्टोरी टुडे या यू ट्यूब चॅनेलवर “ओळख ” या सदरात पहिलीच मुलाखत ही दोन विशेष मुलांची आई असलेल्या सौ अर्चना पाटील यांची घेण्यात आली आहे.सौ अर्चना पाटील यांची मुलगी कर्णबधिर असूनही आज ती आंतरराष्ट्रीय कीर्तीची भरतनाट्यम नृत्यांगना आहे. तर स्वमग्न असलेला मुलगा चक्क गणित विषयात पी एचडी करीत आहे.
सौ अलका भुजबळ यांनी घेतलेल्या या मुलाखतीत सौ अर्चना पाटील यांनी त्यांची, त्यांची पतीची जिद्द, मुलांचा प्रतिसाद आणि नातेवाईकांचा झालेला असह्य त्रास हा सर्व संघर्ष अतिशय निर्लेपपणे उलगडून दाखविला आहे.
— टीम एन एस टी ☎️ 9869484800
अलका भुजबळ ह्यांना वेळापुरे परिवाराकडून अभिष्टचिंतन🙏👏💐
आपण असेच कायम प्रगतीपथावर रहावे. ,जनसामान्यांना मार्गदर्शन करत रहावे., त्यांना प्रोत्साहित करत रहावे. ,
आपल्या न्युज स्टोरी चॅनेलमुळे अनेकांना उत्स्फुर्तपणे विचारांची देवाणघेवाण करणे शक्य झाले. असे महत्पूर्ण कार्य आपण करत आहात ह्यासाठी आपणांस निरामय आरोग्यदायी दिर्घायु लाभो.
Congratulations Alka💐💐proud of you 🙏🙏
अभिनंदन अलका ! न्यूज स्टोरी टुडेच्या निमिर्ती कडून प्रकाशकाकडे वाटचाल करत अलकाने न्यूज स्टोरी टुडेच्या चॅनलचा प्रारंभ केला.
तेही ६२ वर्षे वयात ! कौतुक करावे तेवढे कमीच ! तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !💐🤝
अलका तुझे खूप खूप अभिनंदन, न्यूज स्टोरी स्टोरी ची अशीच उत्तरा उत्तर प्रगती कडे वाटचाल होऊ दे ही माझ्याकडून तुला शुभेच्छा,💐👍✊
अलका भुजबळ यांचा सन्मान वाचून आनंद झाला..समाजातील अनेक कर्तृत्ववान व्यक्तींना समाजासमोर आणण्याची त्यांची धडपड कौतुकास्पद च आहे..मनापासून अभिनंदन..
अलका ताई आपले खूप खूप अभिनंदन.
खूप खूप अभिनंदन!
अलका मॅडमचे हार्दिक अभिनंदन.
न्युज स्टोरी टुडे या चॅनल च्या यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा अलका भुजबळ मॅडम व श्री देवेन्द्र भुजबळ साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन सदैव आपली छायाचित्रकार विजय होकर्णे
अलकाताई खूप खूप अभिनंदन