Monday, March 2, 2026
Homeबातम्याशिवाई दिनदर्शिका प्रकाशित

शिवाई दिनदर्शिका प्रकाशित

सन २०२६ या वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या शिवाई दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा शिवजयंतीचे औचित्य साधून शिवाई बालक मंदिर शाळेत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे तसेच शाळेचे संस्थापक कै. ॲड. शशिकांत ठोसर आणि कै. सौ. सीमा ठोसर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.

विश्वस्त मंडळाच्या कार्यवाह ॲड. सौ. शिल्पा भागवत यांनी यावेळी बोलताना सांगितले की, या दिनदर्शिकेत माजी विद्यार्थ्यांचे मनोगत, विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कविता, मान्यवरांचे लेख आणि शाळेची आतापर्यंतची थोडक्यात वाटचाल यांचा समावेश करण्यात आला आहे.

जेष्ठ शिवसैनिक काका हरदास यांच्या हस्ते दिनदर्शिका समिती मधील श्री. प्रशांत पाटील, सौ.अनघा मेढेकर, सौ. शैलजा ढमाळ, श्रीमती वनिता घाडगे आणि श्री. पद्माकर खरे या शिक्षकांचा अक्षर पुष्प व कॅलेंडर देऊन सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात शाळेचे संस्थापक कै. ॲड. ठोसर साहेब यांच्या आठवणींना उजाळा देत साहेबांसोबतच्या अनेक आठवणी जागवल्या. त्यांना स्वतःला भ्रमंती करणे फार आवडते. अनेक देश त्यांनी जवळून पाहिले आहे हे सांगितले. विद्यार्थ्यांना वाचनाचा छंद लावा असे शिक्षकांना सांगितले. ही दिनदर्शिका शाळेच्या कार्याचा आरसा असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. वैशाली विभांडिक यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका सौ. धनश्री फणसळकर यांनी सादर केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास विविध शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशा प्रकारे शिवाई बालक मंदिर शाळेच्या दिनदर्शिके चा प्रकाशन सोहळा शाळेच्या जुन्या आठवणींनी भारावलेल्या वातावरणात संपन्न झाला.

— टीम एन एस टी. ☎️ 91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments