Homeसाहित्यफेसबुक फ्रेंड ..

फेसबुक फ्रेंड ..

फेसबुक फ्रेंड भले
वैशिष्ट्ये ती विशेष
माहीत नसे असूया
कधी न मत्सर द्वेष

सीमापार असे मैत्री
असो देश न् परदेश
सर्वंदूर पसरले सारे
भासती जणूं सर्वेश

नारी पुरुष नसे भेद
पुसते धर्म जात रेष
भले राहे भिन्नभाषा
असो कुठला प्रदेश

वयाचेही बंधननाही
रे आबालवृद्धाप्रवेश
जो जो आहे इच्छूक
सकलाकरे समावेश

पटले नाही मित्र जर
डिलीट कर अवशेष
बदलत राहे दोस्त ते
मित्रसामील करेफ्रेश

इथे नाही हेतू काही
मैत्री करण्यांत उद्देश
ऑन लाइन फ्रेंड बरे
कधी ना करे उपदेश

दुसरीखाती उघडावे
पुनश्च करी श्रीगणेश
फ्रेंड लिमिटस् फुल्ल
तरी ही नवीन उन्मेष

हेमंत मुसरीफ

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️+91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments