आज जागतिक वसुंधरा दिन आहे. त्यानिमित्ताने हा अष्टाक्षरी काव्य प्रकार.
जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
वसुंधरा माझी आई
जन्मा आलो ही पुण्याई
जरी जन्मदात्री नसे
परि वाटे नवलाई
गीत किती गाऊ बाई
प्रदुषण करा कमी
आरोग्याला जपण्याची
घ्यावी बालकांनो हमी
घर गावाची स्वच्छता
बाळगुन मनी तंत्र
घरोघरी देऊ चला
लक्ष्मी निवासाचा मंत्र
प्राणी, पक्षी वन्यजीव
वृद्धिंगत रानजाई
सुख वास्तू वन्य राही
भासे सदा अपुर्वाई
जल असे अनमोल
भविष्याचे ऊर्जास्रोत
प्लास्टिकला घालू बंदी
हाच भविष्याचा स्त्रोत
प्राणवायू वाढे आयू
सावित्रीचा सत्यवान
वटवृक्ष संजीवन
झाला आत्मा भाग्यवान
थोडे थोडे जल शिंपू
वृक्ष करू वृद्धिंगत
देश करू बलशाली
होऊ सदैव प्रगत
पाणी वाचवा संदेश
वृक्ष रोपन आदेश
तरूणांनो जागे व्हावे
नव वर्ष हे विशेष

— रचना : सौ.शोभा कोठावदे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
