Homeबातम्यानवी मुंबईत घुमले "नमन वीरतेला"

नवी मुंबईत घुमले “नमन वीरतेला”

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर यांची नात, महिला शाहीर विनता जोशी यांचा “नमन वीरतेला” हा पोवाडे व सावरकर रचित गीतांचा कार्यक्रम सावरकरप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात नवी मुंबईतील नेरूळ येथे नुकताच संपन्न झाला. त्यांच्या आवेशपूर्ण सादरीकरणामुळे सर्व प्रेक्षक संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत आपापल्या जागेवर खिळून राहिले.

या प्रसंगी महापौर सुजाता पाटील, माजी खासदार संजीव नाईक, भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, निवृत्त माहिती संचालक – लेखक देवेंद्र भुजबळ, नगरसेवक सूरज पाटील, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष भगवानराव ढाकणे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सर्वांचा व्यासपीठावर बोलावून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री देवेंद्र भुजबळ यांनी त्यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता” हे पुस्तक विनता जोशी यांना भेट दिले. हे पुस्तक चाळून विनता जोशी यांनी सावरकरांच्या एका वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकणारे संशोधनपर पुस्तक लिहिल्याबद्दल श्री भुजबळ यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष कानडे यांनी अतिशय आटोपशीरपणे केले. सावरकर विचार मंच, नवी मुंबई आणि मातृभूमी प्रतिष्ठान, नेरूळ यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

स्वा. सावरकरांच्या जन्म शताब्दीपासून; म्हणजेच १९८३ पासून विनता जोशी यांनी आजवर देशात व परदेशात मिळून एक हजारहून अधिक कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments