नमस्कार मंडळी.
आज महावीर जयंती च्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

जसे की, आपणास काल कळविले होते, त्या प्रमाणे आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांची मुलाखत आज मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हॅलो सखी मध्ये दुपारी १२ ते १२.५० अशी पन्नास मिनिटे थेट प्रसारित झाली. प्रसिद्ध सूत्र संचालक डॉ मृण्मयी भजक यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही मुलाखत घेतली.
अलकाने देखील मुद्देसूद उत्तरे दिली. तसेच प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक दिली. कार्यक्रमाच्या निर्मात्या संध्या पुजारी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सर्व निर्मिती, प्रसारण उत्तम केले.

आपण जर ही मुलाखत पाहिली असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
ज्या व्यक्ती ही मुलाखत पाहू शकल्या नसतील, त्यांच्यासाठी यू ट्यूब लिंक तयार झाल्यावर ती आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात येईल.
या सर्व धावपळीमुळे आजचे नियमित पोर्टल प्रसिद्ध करता येणार नाही,याची आपण कृपया नोंद घ्यावी.
आपला लोभ आहेच, तो अधिक वाढेल, अशी आशा आहे.
आपली स्नेहांकित
— टीम एन एस टी ☎️ 9869484800