‘झेप’ या पुस्तकाचे प्रकाशन भलेही भूतानमध्ये झाले असेल; परंतु या पुस्तकात श्री. देवेंद्र भुजबळ यांनी शब्दबद्ध केलेल्या कर्तृत्ववान दुर्गांपैकी एक असलेल्या; माझी सहचारिणी प्रा डॉ. मनीषा नितीन चाळसे यांच्या हस्ते, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, आमच्या घरी सर्व देवी-देवतांच्या साक्षीने ‘झेप’ पुस्तकाचे पूजन करून त्याचे साग्रसंगीत मंगलमय शुभारंभ करण्याचा एक भावपूर्ण योग जुळून आला.
नवरात्रीच्या पवित्र पर्वावर, स्त्रीशक्तीचा जागर आणि कर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या या पुस्तकाचे पूजन करताना मन अभिमानाने आणि आनंदाने भरून आले. या पुस्तकातील प्रत्येक कथा ही केवळ एका महिलेच्या यशाची कहाणी नसून, तिच्या संघर्षाची, जिद्दीची, ध्येयासक्तीची आणि परिस्थितीवर मात करून उंच भरारी घेण्याच्या सामर्थ्याची प्रेरणादायी गाथा आहे. या सर्व कथा निश्चितच बोधपूर्ण, अर्थपूर्ण आणि समाजाला सकारात्मक दिशा देणाऱ्या आहेत.
अशा विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या दुर्गांच्या प्रेरणादायी कथा एकाच पुस्तकात गुंफून त्यांना व्यापक वाचक वर्गापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य श्री. देवेंद्र भुजबळ यांनी केले आहे. त्यांचा हा प्रयत्न केवळ स्तुत्यच नाही, तर भावी पिढीला प्रेरणा देणारा आणि स्त्रीशक्तीचा सन्मान अधोरेखित करणारा आहे.

या सुंदर संकल्पनेला शब्दरूप देऊन अनेक कर्तृत्ववान महिलांच्या प्रवासाला पुस्तकाच्या माध्यमातून चिरंतन करण्यासाठी श्री. देवेंद्र भुजबळ यांनी घेतलेल्या परिश्रमांचे मनापासून कौतुक !
श्री. देवेंद्र भुजबळ आणि सौ. अलका भुजबळ यांचे मनःपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन ! 🙏,💐

‘झेप’ मधील या प्रेरणादायी कथा अनेकांना नवी उमेद देतील, स्वप्नांना बळ देतील आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आकाशाला गवसणी घालण्याची प्रेरणा देतील, हीच सदिच्छा !
‘झेप’ घेणाऱ्या प्रत्येक दुर्गेला मानाचा मुजरा ! 🌺🙏
— लेखन : नितीन चाळसे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
