भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीवर “शब्दांच्या वाटेवर” या आजच्या कार्यक्रमात रात्री 8.30 वाजता आपल्या पोर्टलचे संपादक- लेखक श्री देवेंद्र भुजबळ यांची मुलाखत प्रसारीत होत आहे.
मुलाखतकार पूनम चांदोरकर यांनी चांगले प्रश्न काढले होते. श्री भुजबळ यांना वाचनाची आवड कशी लागली, शब्दांच्या वाटेवर ते कसे वळले, लिखाणामागची त्यांची प्रेरणा,


www.newsstorytoday.com या पोर्टलची निर्मिती, पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या लेखमाला पुस्तक रुपात कशा प्रकाशित झाल्या, अन्य पुस्तकांचे संपादन, प्रकाशन अश्या विविध प्रश्नांनी खूप छान मुलाखत झाली आहे.

ही मुलाखत पाहून आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यास आनंद होईल.
केंद्र प्रमुख श्री राजेश दळवी, निर्माते श्री दीपक शर्मा, सहायक निर्माते श्री संजय झनके, अन्य तंत्रज्ञ, सहकारी आणि मुलाखतकार पूनम चांदोरकर या सर्वांचे मनापासून आभार.
— टीम एन एस टी. ☎️ + 91 9869484800
