Homeबातम्या‘तो आलाय’ प्रकाशित !

‘तो आलाय’ प्रकाशित !

“गोष्टी तुमच्या आमच्या” या कथासंग्रहाच्या यशानंतर  लेखक किरण बोरकर यांच्या ‘तो आलाय’ या दुसऱ्या कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या वेळी साहित्यसंपदा चे संस्थापक वैभव धनावडे, स्टार्ट गिविंग फाऊंडेशनचे सदस्य डॉ. सतीश डोईफोडे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अन्वय प्रतिष्ठानचे संस्थापक ऍड. वैभव करंदीकर, तर विशेष पाहुणे म्हणून ईशान संगमनेकर उपस्थित होते. मान्यवरांनी मोजक्या आणि प्रभावी शब्दांत लेखकाच्या साहित्यिक वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

या कथासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास लेखक श्रीकांत पेटकर, गझलकारा स्मिता हर्डीकर, कवी मयूर पालकर, शिक्षकरत्न पुरस्कार विजेत्या कुंदा झोपे, कवी संजय कदम, कवयित्री करुणा पांचाळ व इतर साहित्यिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली कदम यांनी वेगळ्या शैलीत करत कार्यक्रमाला रंगत आणताना कवयित्री मानसी नेवगी यांच्या सहित स्वलिखित नाटुकली सादर केली.
   
कवयित्री सलोनी बोरकर यांनी आभार प्रदर्शन करताना ज्येष्ठ लेखिका सौ. वृषाली बोरावके यांनी प्रस्तावना दिल्याबद्दल आणि पुस्तकाचे टंकलेखन करणाऱ्या स्मिता नेवे तसेच पुस्तकाचे सुंदर मुखपृष्ठ साकारणाऱ्या ओमकार बोरकर यांचे आभार मानले.

स्टार्ट गिविंग फाऊंडेशनच्या वतीने विवेक बोटकोंडले आणि राजेंद्र परब यांनी मनोगत व्यक्त केले.

ज्ञानसेवा फाऊंडेशनच्या वतीने सुबोध पेटकर यांनी मनोगत व्यक्त केले.

लेखकाचे मोठे बंधू विवेक बोरकर यांनी कुटुंबाच्या वतीने मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी स्टार्ट गिविंग फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचा गौरव करून संस्थेच्या सदस्यांचा सत्कार केला.

उपस्थित अनेक साहित्यप्रेमींनी *‘तो आलाय’* हा कथासंग्रह खरेदी करून लेखकाला प्रोत्साहन दिले. त्यांच्या या प्रेमाबद्दल लेखकाने आभार व्यक्त केले असून, वाचकांनी पुस्तक वाचून आपला अभिप्राय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ‘तो आलाय’ हा कथासंग्रह वाचकांच्या भेटीला आल्याने बोरकर कुटुंबियांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vedvati Kulkarni on खरा डॉक्टर
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on प्राणांचे झुंबर…