Homeसंस्कृतीआपले पत्र मिळाले. …

आपले पत्र मिळाले. …

नमस्कार, सर.
आपले पत्र मिळाले. खूप वर्षांनी असे पत्र, ते ही  जागतिक पुस्तक दिनाच्या पूर्वसंध्येला मिळाल्याने खूप आनंद झाला. मन जुन्या काळात गेले. या आधीची सर्व पत्रे मी जपून ठेवली आहेत. आपले पत्र सुद्धा एक अमूल्य ठेवा आहे, हे सांगणे न लगे .

सर, विशेष म्हणजे आपण केवळ औपचारिकदृष्ट्या, माझी तिन्ही पुस्तके मिळाल्याचे न कळविता (विशेष म्हणजे  सरांनी तिन्ही पुस्तके विकत घेतली आहेत !) पत्रात पुस्तकांच्या अनुषंगाने जे अमूल्य विचार व्यक्त केले आहेत, ते सर्व वाचकांना समजावे म्हणून, आपले पत्र जसेच्या तसे पुढे देत आहे….

सातारा

15.04.2026

आदरणीय देवेंद्र भुजबळ सर –
प्रा. मनोहर यादव यांचा
स. न. वि. वि.
आपण पाठवलेली तिन्ही पुस्तके; माध्यमभूषण, कला साहित्य भूषण, संवादभूषण आजच मिळाली. खूप खूप आभार !आता रात्रीचा पाऊण वाजला आहे. सकाळी पुस्तके ताब्यात घेऊन तशीच टेबलवर ठेवली व पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे गावी (नारायणवाडी, ता. कराड, जि. सातारा) गेलो. ११ वाजल्यापासून तिन्ही पुस्तकांमधील प्रत्येक व्यक्तीस (पानास) फक्त हवा दिली ! निवांत वाचन करणे हा माझा छंद आहे.

तिन्ही पुस्तकांमधील सर्व व्यक्तीरेखा या मातीतून तयार झालेल्या हिरे आहेत ! ते मातीतच राहून कोणाच्याच लक्षात आले नसते. आपल्या लेखनाने त्यांना शोधून ग्रंथरूपाने साहित्याच्या भांडारात ग्रंथीत केलेत आणि आमच्यासारख्या वाचकांपुढे उभी केली. ही खरोखर मोठी कृतज्ञतेची व सर्जनशीलतेची कृती आहे !

हल्ली समाज अधःपतनाचा एवढा कळस  झाला आहे की, माणूस आईवडील, गुरू, देव सर्वांनाच विसरून भोगवादाच्या जाळ्यात अडकला आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जवळून पाहिलेल्या या सर्व व्यक्तींच्या ओळखी- त्यांची वैशिष्ट्ये – प्रासंगिक संवाद मोठ्या मनाने प्रसिद्ध केलेत, त्याला सर्जनशील साहित्यिकाचे मन लागते. मंत्रालय, शासकीय कार्यालये यांसारख्या इमारतींमध्ये राहूनही आपण आपले मनी आपल्या साहित्य प्रेमाची भावना अखंडपणे जतन केलेली आहे हे विशेष!
पुन्हा एकदा आभार ! आपल्या पत्नी सौ. अलकाताईंना नमस्कार !
ता. क.: श्री  अशोक कुंदप
भेटीत आपलाच विषय असतो. आपला विश्वासू,
प्रा. मनोहर शामराव यादव.

प्रा. मनोहर शामराव यादव.

खरोखरच, सर्व आयुष्य  शिक्षण, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात वेचलेल्या यादव सरांनी माझ्या पुस्तकांच्या निमित्ताने पुस्तके, वाचन आणि  मनावर, जीवनावर  होणारे सखोल परिणामांची अत्यंत मोजक्या शब्दात ओळख करून दिली आहे, या बद्दल सरांचे पुनश्च एकदा मनःपूर्वक आभार.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments