“बुडबुडे”
मंडळी,
“स्वप्नलोक” हे क्रिती के.सी. सक्सेना यांचं चित्र म्हणजे वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषेवर उभं असलेलं एक अधांतर आहे. या चित्रातील मुलगी जणू दुसऱ्यांच्या पंखांचा वापर करून आकाशात झेपावत आहे. पण तिची ही झेप संपूर्ण मुक्त नाही — तिचे पाय बुडबुड्यांनी अडकवलेले आहेत.
या चित्रात एका जुनाट बसला बांधलेले रंगीत फुगे, पक्ष्यांचे थवे, झाडांची खोलवर गेलेली मुळे, आणि पळणारी हरणं —हे सारं एकाच वेळी निरागसता आणि गुंतागुंत दाखवतं.
“बुडबुडे” ही एक अशी कविता आहे ज्यात प्रत्येकाची अधांतरी असणारी झेप, स्वप्न आणि सत्य यामधली द्विधा मानसिक अवस्था, आणि अर्धवट संवादांचं एक भावनिक प्रतिबिंब उमटतं — अगदी स्वप्नांच्या बुडबुड्यांसारखं: पुसट आणि निसटणारं…
यूट्यूब चॅनलची लिंक 👇इथे खाली देत आहे.
मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.

— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️+91 9869484800
