Homeबातम्याराजाराम जाधव यांच्या २ पुस्तकांचे प्रकाशन

राजाराम जाधव यांच्या २ पुस्तकांचे प्रकाशन

साहित्यिक श्री राजाराम जाधव यांच्या “माझ्या जीवनातील प्रेरणादायी सप्तर्षी” हा चरित्रात्मक लेख संग्रह आणि ‘नांदी सामाजिक परिवर्तनाची‘ हा काव्यसंग्रह अशा दोन नवीन साहित्यकृतींचा प्रकाशन सोहळा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अमरावती येथील श्री. शिवाजी शिक्षण महाविद्यालयात रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

या प्रेरणादायी सोहळ्यात या प्रेरणादायी सोहळ्यात “माझ्या जीवनातील प्रेरणादायी सप्तर्षी” या पुस्तकांत ज्यांच्यावर लेख लिहिले आहेत असे, श्री. हरिसिंग साबळे (निवृत्त आयुक्त, इंटेलिजन्स ब्युरी, नागपूर); सौ. व श्री. प्रा. न.मा. जोशी सर; सौ. व श्री. निंबाजीराव भगत; सौ. व श्री. रमेश विठ्ठलराव काकडे; मित्र परिवार – सर्वश्री प्रदीप गोसावी, वैजनाथ लटके व राजेंद्र पवार, सौ. व श्री. देवेंद्र भुजबळ (निवृत्त माहिती संचालक तथा संपादक, न्यूज स्टोरी टुडे), सौ. अनिता व प्राचार्य डॉ. संजय खडसे, सौ. ज्योती व श्री. संजय महल्ले (मेधा पब्लिशिंग हाऊस, अमरावती), श्री. एकनाथ गोफणे यांचा सत्कार करण्यात येईल.

उत्कृष्ट आणि प्रेरणादायी असलेल्या या प्रकाशन सोहळ्यात सर्व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी  विनंती आयोजकांनी केली आहे.

अल्प परिचय : –
साहित्यिक राजाराम गो. जाधव मूळचे यवतमाळ जिल्ह्य़ातील लाखखिंड  येथील आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी एम.ए. बी.एड. (नागपूर व अमरावती विद्यापीठ) पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे मंत्रालयात सहायक म्हणुन आपल्या कारकीर्दीची सुरुवात करून ते सहसचिव या पदावरून ३१ ऑगस्ट २०१६ रोजी सेवानिवृत्त झाले. वाचन, लेखन आणि सामाजिक कार्य हा त्यांचा आवडता छंद आहे.

त्यांचे ‘वादळ वारा’ (२००४)’; ‘वाळवंटातील संधीप्रकाश’; ‘अंधार यात्रीचे स्वप्न’; ‘अजिंक्यवीर’ हे आत्मचरित्र; ‘चंद्रकला’ कादंबरी; ‘हुंदके सामाजिक वेदनेचे’; (शेवटची चारही पुस्तके न्यूज स्टोरी टुडे ने प्रकाशित केली आहेत.) ही पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना विविध पुरस्कार व मानचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले आहे. चाळीसगाव येथे संपन्न झालेल्या बंजारा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे.

न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे श्री राजाराम जाधव यांचे हार्दिक अभिनंदन आणि प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments